लष्कराची अर्नियामध्ये अतिरेक्यांविरुद्ध मोहीम

By Admin | Updated: November 28, 2014 23:56 IST2014-11-28T23:56:18+5:302014-11-28T23:56:18+5:30

जम्मू-काश्मीरच्या अर्निया भागात बंकरमध्ये दडून बसलेल्या एका अतिरेक्याला बाहेर काढण्यासह ठार झालेल्या नागरिकांचे मृतदेह मिळविण्यासाठी लष्कराने मोहीम छेडल्याने नव्याने चकमकी झडत आहेत.

A campaign against militants in Arnia army | लष्कराची अर्नियामध्ये अतिरेक्यांविरुद्ध मोहीम

लष्कराची अर्नियामध्ये अतिरेक्यांविरुद्ध मोहीम

उधमपूर : जम्मू-काश्मीरच्या अर्निया भागात बंकरमध्ये दडून बसलेल्या एका अतिरेक्याला बाहेर काढण्यासह ठार झालेल्या नागरिकांचे मृतदेह मिळविण्यासाठी लष्कराने मोहीम छेडल्याने नव्याने चकमकी झडत आहेत.
 अतिरेक्यांनी लष्कराच्या दोन बंकर्सचा ताबा घेत गोळीबार केल्यामुळे तीन जवान शहीद झाले. तीन रहिवाशांसह एकूण दहा जण मारले गेले. लष्कराने शुक्रवारी सकाळी नव्याने शोधमोहीम सुरू केल्यानंतर पुन्हा चकमकी झडल्या. शेवटचे वृत्त हाती येईर्पयत अधूनमधून गोळीबार सुरूच होता.
नागरिकांचे मृतदेह पडूनच..
अतिरेकी दडून बसलेल्या बंकर्सच्या भागात तीन नागरिकांचे मृतदेह पडून असून ते मिळविण्यासाठी लष्कराच्या जवानांनी या भागाला वेढा घातला आहे. दडून असलेल्या एका अतिरेक्याला शोधण्याची मोहीमही त्याचवेळी सुरू आहे. लष्करी गणवेशात असलेल्या अतिरेक्यांनी गुरुवारी बंकर्सवर हल्ला केला. आत्मघाती हल्ला घडवून  भारताच्या हद्दीत शिरले असावेत. (वृत्तसंस्था) लष्कराच्या गोळीबारात चार अतिरेकी मारले गेले असून केवळ एक अतिरेकी बंकरमध्ये दडून असल्याचे सूत्रंनी सांगितले. 

 

Web Title: A campaign against militants in Arnia army

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.