इम्फाळ : मणिपूरच्या कामजोंग जिल्ह्यात आसाम रायफल्सने तात्पुरती उभारलेली छावणी जमावाने शनिवारी हल्ला करून उद्ध्वस्त केली. लाकडाच्या वाहतुकीवर लागू केलेले निर्बंध व अन्य काही कारणांमुळे लोक संतापले व त्यातून ही घटना घडली, असे सांगण्यात आले.नागा जमातीचे लोक बहुसंख्याक असलेल्या कासोम खुलेन भागातील रहिवाशांनी हा हल्ला केला. या भागात घरे बांधण्यासाठी लाकडाच्या वाहतुकीवर आसाम रायफल्सच्या जवानांनी बंदी घातल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.
मणिपूरमध्ये जमावाकडून छावणी उद्ध्वस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 06:05 IST