मोदींच्या प्रसंगावधानानं बचावला कॅमेरामनचा जीव
By Admin | Updated: August 30, 2016 18:19 IST2016-08-30T18:13:17+5:302016-08-30T18:19:20+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समय सुचकतेमुळे आज दूरदर्शनच्या एका कॅमेरामनचा जीव वाचला आहे.

मोदींच्या प्रसंगावधानानं बचावला कॅमेरामनचा जीव
ऑनलाइन लोकमत
राजकोट, दि. 30 - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समय सुचकतेमुळे आज दूरदर्शनच्या एका कॅमेरामनचा जीव वाचला आहे. गुजरातमधल्या राजकोटमध्ये मोदींच्या उपस्थितीत जेव्हा सौना परिजल योजनेच्या अंतर्गत धरणातून पाणी सोडण्यात आलं, त्यावेळी धरणाच्या वर उभे असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाण्यात असलेल्या कॅमेरामनला सूचना केल्या. त्यामुळे पाण्यात उभ्या असलेल्या दूरदर्शनचे कॅमेरामन शेजकरांचा जीव थोडक्यात बचावला आहे.
पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज सौना परिजल योजनेचा उद्घाटन झालं. मोदींनी हिरवा कंदील दाखवताच नर्मदेच्या पात्रातून पाणी थेट सौराष्ट्राकडे सोडण्यात आलं. त्याआधी या सगळ्या वृत्ताचं चित्रीकरण करण्यासाठी दूरदर्शनचे कॅमेरामन संतोष शेजकर नदीपात्रात उतरले होते.
यावेळी घाईघाईनं मोदींनी मुख्यमंत्री विजय रुपानींना सांगून त्यांना हटवण्यास सांगितलं आणि पाण्याचा प्रवाह एवढा तीव्र होता की कॅमेरामन नदीपात्रातून दूर जाताच काही क्षणात पाण्याचा लोंढा कॅमेऱ्याला येऊन धडकला आणि कॅमेरा वाहून गेला. मात्र या प्रकारामुळे सर्व स्तरांतून मोदींचं कौतुक होत आहे. मोदींच्या प्रसंगावधानामुळे आज एका कॅमेरामनचा जीव वाचला असून, राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय ठरला आहे.