पाकिस्तानविरोधात युद्ध पुकारा - शहीद गुरुनामच्या वडिलांची मागणी

By Admin | Updated: October 23, 2016 13:49 IST2016-10-23T13:49:45+5:302016-10-23T13:49:45+5:30

पाकिस्तानविरुद्ध निर्णायक युद्ध पुकारा, अशी मागणी शहीद गुरुनाम सिंगच्या वडिलांनी केली आहे.

Called a war against Pakistan - the father's demand for martyr guru | पाकिस्तानविरोधात युद्ध पुकारा - शहीद गुरुनामच्या वडिलांची मागणी

पाकिस्तानविरोधात युद्ध पुकारा - शहीद गुरुनामच्या वडिलांची मागणी

   

ऑनलाइन लोकमत
जम्मू , दि. 23 - अनेक संधी देऊनही न सुधारणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पाकिस्तानविरुद्ध निर्णायक युद्ध पुकारा,  अशी मागणी शहीद गुरुनाम सिंगच्या वडिलांनी केली आहे. पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून एलओसीवर केलेल्या गोळीबारात गंभीर जखमी झालेले जवान गुरुनाम सिंग यांचे शनिवारी रात्री निधन झाले होते.
(पाकच्या गोळीबारात जखमी झालेला जवान अखेर शहीद)
गुरुनाम सिंगचे वडील कुलबीर सिंग म्हणाले, माझा मुलगा शूर होता. त्याने देशासाठी हौतात्म्य पत्करले आहे. त्याच्या मृत्यूचे आम्हाल दु;ख झालेले नाही तर मी आनंदी आहे. आता पाकिस्तानविरोधात युद्ध व्हावे अशी आमची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी आहे. यावेळी जम्मू येथे अद्ययावत हॉस्पिटल सुरू करण्याची मागणी कुलबीर सिंग यांनी केली आहे. गुरुनामची आई जसवंत कौर यांनीही बीएसएफच्या जवनांसाठी स्वतंत्र रुग्णालय असावी अशी मागणी केली आहे. 

Web Title: Called a war against Pakistan - the father's demand for martyr guru

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.