कॉल गर्ल्स रॅकेट
By Admin | Updated: January 30, 2015 21:11 IST2015-01-30T21:11:51+5:302015-01-30T21:11:51+5:30
कॉल गर्ल्सचे रॅकेट

कॉल गर्ल्स रॅकेट
क ल गर्ल्सचे रॅकेट आणखी एक जाळ्यातनागपूर : नागपुरात कॉल गर्ल्सचे रॅकेट चालविणाऱ्या आणखी एका दलालाला गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागातील पथकाने अटक करून त्याचा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी व्ही. सी. गवई यांच्या न्यायालयातून २ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी रिमांड प्राप्त केला. पुरंदर ऊर्फ पाजी राम यादव रा. वर्मा ले-आऊट , असे या आरोपीचे नाव आहे. त्याला आज सकाळी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून ताब्यात घेण्यात आले. १३ जानेवारी रोजी शिवाजीनगर येथे झालेल्या बिल्डर रितेश बैसवारे याच्या खुनात तो आरोपी आहे. सचिन सोनारकर, पाजी आणि दोन-तीन दलाल हे एकत्रीतपणे सुंदरींकडून बड्या हॉटेलांमध्ये देहव्यापार करायचे. त्यांच्या मोबाईल वॉटस्अपवर बऱ्याच सुंदरीचे फोटो आहेत.प्रॉडक्शन वॉरंटवर पाजीला अटक केल्यानंतर तपास अधिकारी पोलीस निरीक्षक बी. एम. पोवार यांनी त्याला न्यायालयात हजर केले. दलाली करणाऱ्या या आरोपींच्या ताब्यात आणखी मुली आहेत काय, आणखी कोण दलाल आहेत, कोणकोणत्या हॉटेलांमध्ये ते या सुंदरींना पोहचवीत होते, त्यांचे नेहमीचे ग्राहक कोण याबाबत सखोल तपास करावयाचा आहे, असे सांगून त्यांनी न्यायालयाला पोलीस कोठडी रिमांडची मागणी केली. न्यायालयाने पाजीला २ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.