शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

Rafale Deal: कॅगचा अहवाल राष्ट्रपतींना सुपूर्द; वादाचं विमान पुन्हा उडण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2019 17:31 IST

कॅगचा अहवाल उद्या संसदेत मांडला जाण्याची शक्यता

नवी दिल्ली: गल्लीपासून दिल्लीपर्यंत गाजणाऱ्या राफेल डीलबद्दलचा अहवाल कॅगनं राष्ट्रपतींकडे सुपूर्द केला आहे. काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी राफेल विमान खरेदी प्रकरणावरुन थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे. त्यामुळे कॅगचा अहवाल संसदेत कधी मांडला जाणार, याची उत्सुकता आहे. कॅगनं आपला अहवाल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पाठवला आहे. इंग्रजी वृत्तवाहिनी टाईम्स नाऊनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. कॅगनं अहवालाची एक प्रत राष्ट्रपतींना आणि दुसरी प्रत अर्थ मंत्रालयाला पाठवली आहे. या अहवालात एकूण 12 प्रकरणं आहेत. काही आठवड्यांपूर्वीच संरक्षण मंत्रालयानं राफेलबद्दलचा सविस्तर उत्तर आणि संबंधित अहवाल कॅगला सोपवला होता. यामध्ये खरेदी प्रक्रियेबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती होती. याशिवाय 36 राफेल विमानांच्या किमतींचाही समावेश होता. कॅगचा अहवाल अतिशय मोठा असून तो प्रोटोकॉलप्रमाणे सर्वप्रथम राष्ट्रपतींना पाठवण्यात आला. यानंतर आता राष्ट्रपती भवनाकडून हा अहवाल लोकसभा आणि राज्यसभा अध्यक्षांच्या कार्यालयाला पाठवला जाईल. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या बुधवारी संपणार आहे. त्यामुळे उद्या किंवा परवा कॅगचा अहवाल लोकसभा आणि राज्यसभेत सादर केला जाऊ शकतो. 

राहुल यांनी सातत्यानं राफेल विमान खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. गेल्याच आठवड्यात त्यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत राफेल खरेदीत पंतप्रधान कार्यालयानं हस्तक्षेप केल्याचा आरोप केला. राफेल डीलमध्ये पीएमओनं समांतर वाटाघाटी केल्यानं संरक्षण मंत्रालयावर नामुष्की ओढवली. या हस्तक्षेपाचा मंत्रालयानं निषेधदेखील केला होता, असं राहुल म्हणाले. यावेळी राहुल यांनी 'द हिंदू' या वृत्तपत्रातील बातमीचा संदर्भ दिला होता.

टॅग्स :Rafale Dealराफेल डीलcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीParliamentसंसद