शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

कॅगला समजले भारतीय रेल्वेच्या विस्कटलेल्या गणिताचे गुपित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2018 16:40 IST

कॅगने मंगळवारी यासंदर्भात संसदेत अहवाल सादर केला. त्यात कॅगने निरीक्षणे नोंदवली आहेत.

नवी दिल्ली- भारतीय रेल्वे गेल्या काही वर्षांमध्ये वेळापत्रकापेक्षा अत्यंत उशिरा धावत असल्याचे दिसत आहे.

2017-18 या वर्षी 30 टक्के ट्रेन उशिरा धावल्याचे स्पष्ट झाले आहे. एप्रिल 2017-मार्च 2018 या कालावधीमध्ये केवळ 71.39 टक्के फेऱ्याच वेळेवर झाल्या. त्याआधीच्या वर्षापेक्षा म्हणजे 2016-17 यावर्षी 76.69 टक्के इतक्याच फेऱ्या वेळेनुसार झाल्या होत्या. कॅगला मात्र भारतीय रेल्वेच्या 'मंदयाळीचे' कारण समजले आहे. गेल्या काही दिवसांपासून कॅगने भारतीय रेल्वेमध्ये होत असलेल्या विविध गोंधळाच्या बाबी उजेडात येत आहेत. केंद्र सरकारने घोषित केलेल्या स्थानकांच्या पुनर्विकास योजनेतील त्रूटींमुळे हा उशिर होत असल्याचे कॅगचे म्हणणे आहे. या योजनेमुळे स्थानकांवर रेल्वे थांबण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होत नाही व त्यामुळे वेळापत्रक कोलमडते.

कॅगने मंगळवारी यासंदर्भात संसदेत अहवाल सादर केला. त्यात कॅगने निरीक्षणे नोंदवली आहेत. 24 डब्यांच्या रेल्वे थांबतील अशी स्थानकांवर पुरेशा प्लॅटफॉर्म्सची सुविधा नाही तसेच वॉशिंग पिट लाइन्स आणि स्टॅबलिंग लाइन्स नसल्यामुळेही रेल्वेला उशिर होतो असे मत कॅगने नोंदवले आहे. कॅगने भारतीय रेल्वेच्या 10 विभागांपैकी 15 स्थानकांचा अभ्यास केला.

गेल्याच आठवड्यात याप्रकारेच आणखी एक धक्कादायक माहिती उघड झाली होती. 2014 साली पाठवलेले खत रेल्वेने संबंधित स्थळी 2018 साली पोहोचवले.  आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून मालगाडीतून उत्तरप्रदेशातील बस्ती जिल्ह्यात पोहोचवण्यासाठी खत पाठवले गेले. 2014 मध्ये ही मालगाडी तेथून निघाली. तिला 1400 किमी अंतर पार करुन बस्ती येथे जायचे होते. या खताची किंमत 10 लाख इतकी होती. बस्ती येथे खताची डिलिव्हरी झाली नसल्याचे लक्षात येताच भारतीय रेल्वेशी संपर्क करण्यात आला. मात्र रेल्वेला हे डबे शोधता आले नाहीत. हे डबे भारतभर एका स्टेशनमागे दुसऱ्य़ा स्टेशनमध्ये फिरत राहिले आणि शेवटी 3.5 वर्षांनी बस्ती येथे पोहोचले आहेत. यामधील सर्व खत खराब झाले असून त्याचे मालक रामचंद्र गुप्ता यांनी ते स्विकारण्यास नकार दिला आहे. आपण गेली साडेतीन वर्षे रेल्वेक़डे चौकशी केली मात्र रेल्वेने कोणतेही उत्तर दिले नाही. 

टॅग्स :railwayरेल्वे