परदेश दौरा नाकारल्याने काडीमोड

By Admin | Updated: December 11, 2014 17:39 IST2014-12-11T17:23:17+5:302014-12-11T17:39:27+5:30

महिलेच्या पतीला जाब विचारला असता त्याने आपल्या पत्नीला घरी सर्व सुविधा हव्या असून सुट्ट्यांमध्ये तिला परदेश दौ-यावर घेऊन न गेल्याने तिने आपल्या सोबत न राहण्याचा निर्णय घेतला आहे,

Cadimod rejects foreign tour | परदेश दौरा नाकारल्याने काडीमोड

परदेश दौरा नाकारल्याने काडीमोड

>ऑनलाइन लोकमत
आमदाबाद, दि. ११ - मुंबईतील एका उद्योगपतीच्या पत्नीने आमदाबाद येथील पोलीस ठाण्यात पती पासून वेगळे राहण्याची विनंती केली होती. या मागचे कारण विचारले असता त्या उद्योगपतीच्या पत्नीने तिचा पती दारू पिऊन तिचा मानसिक व शारिरीक छळ करत असल्याचे सांगितले आहे. या बाबत त्या महिलेच्या पतीला जाब विचारला असता त्याने आपल्या पत्नीला घरी सर्व सुविधा हव्या असून सुट्ट्यांमध्ये तिला परदेश दौ-यावर घेऊन न गेल्याने तिने आपल्या सोबत न राहण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यानी सांगितले. तक्रादार महिला ही आमदाबादची असून तिचे मुंबईत तीन बार असणा-या एका उद्योगपतीशी मुंबईतच लग्न झाले होते. लग्नाच्या काही दिवसांनंतर ही महिला आमदाबादमध्ये आपल्या पालकांसोबत राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या दांपत्यातील वाद मिटावा म्हणून दोन दिवसांची मुदत दिली असून दोघांतील भांडण मिटेल अशी आशा आमदाबाद महिला पोलीस विभागानी व्यक्त केली आहे. 
 
 

Web Title: Cadimod rejects foreign tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.