शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Cabinet reshuffle : चिराग पासवानांच्या धमकीला न जुमानता मोदींनी त्यांच्या काकांना केलं मंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 18:37 IST

Cabinet reshuffle Update: आपल्या परवानगीशिवाय पक्षाच्या कोट्यातून मंत्रीपद देणे योग्य नसल्याचं म्हणाले होते चिराग पासवान. मंत्रिमंडळात त्यांना स्थान दिल्यास न्यायालयात जाण्याचा दिला होता त्यांनी इशारा.

ठळक मुद्देआपल्या परवानगीशिवाय पक्षाच्या कोट्यातून मंत्रीपद देणे योग्य नसल्याचं म्हणाले होते चिराग पासवान.मंत्रिमंडळात त्यांना स्थान दिल्यास न्यायालयात जाण्याचा दिला होता त्यांनी इशारा.

लोक जनशक्ती पार्टी (LJP) चे नेते आणि दिवंगत केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग पासवान यांनी मंगळवारी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच आव्हान दिलं होतं. चिराग पासवान यांनी पाटण्यात पत्रकार परिषद घेऊन लोक जनशक्ती पार्टीतून हकालपट्टी केलेले खासदार पशुपती पारस यांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेऊ नये अशी मागणी केली होती. याव्यतिरिक्त त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. परंतु त्यांच्या धमकीला न जुमानता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार पशुपती पारस यांना मंत्री केलं आहे. पारस यांचा शपथविधी सोहळा बुधवारी पार पडला.

खासदार पशुपती पारस हे राम विलास पासवान यांचे भाऊ आणि चिराग पासवान यांचे काका आहेत. मंत्रिमंडळाच्या विस्तारादरम्यान त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. "माझ्या परवानगीशिवाय पक्षाच्या कोट्यातून कोणालाही मंत्रिपद देणं योग्य नाही. तसेच, रामविलास पासवान यांच्या विचारांना पायदळी तुडवत वेगळा गट स्थापन केलेल्या सदस्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. निवडणूक आयोगालाही याची माहिती देण्यात आली आहे," असं त्यांनी सांगितलं होतं. "पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना मंत्रfमंडळात घेणार नाहीत," असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला होता. परंतु बुधवारी त्यांचा शपथविधी सोहळा पार पडला.  दरम्यान, या शपथविधी सोहळ्यापूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर, डॉ. हर्षवर्धन, रमेश पोखरियाल निशंक यांच्यासह १२ केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामे मंजूर केले होते. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तार