शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

२०४७ पर्यंत विकसित भारताचे मांडले लक्ष्य, पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2024 06:39 IST

पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील ही अशा प्रकारची शेवटची बैठक ठरू शकते.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ‘विकसित भारत : २०४७’ साठी आराखडा (व्हिजन डॉक्युमेंट) आणि पुढील पाच वर्षांच्या विस्तृत कृती आराखड्यावर दिवसभर विचारमंथन केले. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील ही अशा प्रकारची शेवटची बैठक ठरू शकते.

सरकारी सूत्रांनी सांगितले की, मे महिन्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर तत्काळ पावले उचलण्यासाठी १०० दिवसांची विषयपत्रिका (अजेंडा) त्वरित अमलात आणण्यासाठी बैठकीत चर्चा करण्यात आली. ‘विकसित भारत’साठीचे ‘व्हिजन डॉक्युमेंट’ दोन वर्षांपेक्षा जास्त गहन तयारीतून साकारले असून, त्यात सर्व मंत्रालयांचा दृष्टिकोन आणि राज्य सरकारे, शैक्षणिक संस्था, उद्योगसंस्था, नागरी समाज, वैज्ञानिकांचा व्यापक सल्ला समाविष्ट आहे. त्यासाठी विविध स्तरांवर २७०० हून अधिक बैठका, कार्यशाळा आणि चर्चासत्रे आयोजित करण्यात आली होती. २० लाखांहून अधिक तरुणांच्या सूचना प्राप्त झाल्या होत्या, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

विकासाची ‘ब्लू प्रिंट’‘विकसित भारत’ आराखडा राष्ट्रीय धोरण, आकांक्षा, उद्दिष्टे आणि कृती बिंदूंसह सर्वसमावेशक ‘ब्लू प्रिंट’ आहे, सूत्रांनी सांगितले. त्याच्या उद्दिष्टांमध्ये आर्थिक वाढ, शाश्वत विकास उद्दिष्टे, राहणीमान सुलभता, व्यवसाय, पायाभूत सुविधा आणि सामाजिक कल्याण सुलभ करणे यांसारख्या क्षेत्रांचा समावेश आहे. या बैठकीत अनेक मंत्रालयांनी आपली कल्पना मांडली.

जनतेचा पाठिंबा मिळवा : मोदी- पंतप्रधान मोदींनी त्यांच्या मंत्री सहकाऱ्यांना निवडणुकीदरम्यान लोकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यास सांगितले. - विकासाला चालना देण्यासाठी आणि समाजाच्या सर्व घटकांचे कल्याण सुनिश्चित करण्यासाठी सरकारने केलेल्या असंख्य उपाययोजनांबद्दलही मोदींनी सांगितले. - बैठकीत विविध मुद्द्यांवर सादरीकरणही करण्यात आले. आपले सरकार सलग तिसऱ्यांदा सत्ता राखेल, असा विश्वास त्यांनी वारंवार व्यक्त केला आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाIndiaभारत