विमा विधेयकाला मंत्रिमंडळाची मंजुरी
By Admin | Updated: December 11, 2014 01:45 IST2014-12-11T01:45:12+5:302014-12-11T01:45:12+5:30
विमा क्षेत्रत थेट विदेशी गुंतवणुकीची मर्यादा 49 टक्क्यांर्पयत वाढविण्याची तरतूद असलेल्या विमा दुरुस्ती विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

विमा विधेयकाला मंत्रिमंडळाची मंजुरी
नवी दिल्ली : विमा क्षेत्रत थेट विदेशी गुंतवणुकीची मर्यादा 49 टक्क्यांर्पयत वाढविण्याची तरतूद असलेल्या विमा दुरुस्ती विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या विधेयकात प्रवर समितीच्या सूचना सामील करून काही दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी संसदेच्या प्रवर पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत संसदेच्या प्रवर समितीने सूचविलेल्या विमा (कायदा दुरुस्ती) विधेयक 2क्क्8 मध्ये सामील करण्याला मंजुरी देण्यात आली. हे विधेयक पुढच्या आठवडय़ात राज्यसभेत मांडले जाण्याची शक्यता आहे.