कॅब बलात्कार प्रकरणाचे पडसाद
By Admin | Updated: December 9, 2014 01:59 IST2014-12-09T01:59:26+5:302014-12-09T01:59:26+5:30
‘उबर’ या कॅब सव्र्हिसचा चालक आरोपी शिवकुमार यादव याची सोमवारी येथील न्यायालयाने तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली़

कॅब बलात्कार प्रकरणाचे पडसाद
आरोपीला कोठडी : प्रशासनाची ‘उबर’वर दिल्लीत बंदी, गृहमंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
नवी दिल्ली : मोबाईल अॅपवर कॅब बुक केलेल्या 27 वर्षीय महिलेवर कॅबमध्येच बलात्कार करणारा ‘उबर’ या कॅब सव्र्हिसचा चालक आरोपी शिवकुमार यादव याची सोमवारी येथील न्यायालयाने तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली़ या घटनेनंतर दिल्ली प्रशासनाने ‘उबर’ कंपनीच्या टॅक्सींवर बंदी घातली आह़े कंपनीने आरोपीची पाश्र्वभूमी न तपासता त्याला कामावर ठेवले होत़े दरम्यान, या घटनेचे लोकसभेत पडसाद उमटले. या पाश्र्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी लोकसभेत या बलात्काराच्या घटनेची तीव्र शब्दांत निंदा केली असून दोषीला कठोर शिक्षा देण्याबाबत आश्वस्त केल़े
पीडित महिला गुडगाव येथील फायनान्स कंपनीत कामाला आहे. शुक्रवारी रात्री तिने मोबाईल अॅपवरून उबर कंपनीची कॅब बुक केली होती़ आरोपी कॅब घेऊन आल्यानंतर कॅबने आपल्या इंद्रलोक येथील घरी जाण्यासाठी ती निघाली होती़
प्रवासादरम्यान तिचा डोळा लागला आणि शिवकुमार याने निजर्न स्थळी कॅब थांबवून तिच्यावर बलात्कार केला होता़ रविवारी मथुरा येथून शिवकुमारला अटक करण्यात आली होती़ सोमवारी त्याला येथील तीस हजारी न्यायालयात हजर करण्यात आल़े न्यायालयाने त्याची तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली़
देशभर या घटनेचे तीव्र पडसाद उमटल़े लोकसभेत काँग्रेस खासदारांनी हा मुद्दा उपस्थित केला़ यानंतर राजनाथसिंह यांनी स्पष्टीकरण देत, या घटनेची तीव्र शब्दांत निंदा केली़ दोषीला कठोरातील कठोर शिक्षा होईल, याबाबत त्यांनी सभागृहाला आश्वस्त केल़े
तत्पूर्वी आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते आणि काँग्रेसप्रणीत विद्यार्थी संघटना नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया अर्थात एनएसयूआयच्या विद्याथ्र्यानी राजनाथसिंह यांच्या घराबाहेर निदर्शने केलीत़ या निदर्शकांना पोलिसांनी ताब्यात घेतल़े त्याचबरोबर युवक काँग्रेसच्या कार्यकत्र्यानी भाजपाच्या राजधानीतील मुख्यालयासमोर निदर्शने केली.
दिल्ली भाजपा खासदारांनीही या घटनेनंतर महिला सुरक्षेवर चिंता व्यक्त करीत गृहमंत्र्यांची भेट घेतली़ गृहमंत्र्यांनी दिल्लीच्या पोलीस आयुक्तांना या दिशेने ठोस पावले उचलण्याचे निर्देश दिले असल्याचे या भेटीनंतर भाजपा खासदारांनी सांगितल़े
(लोकमत न्यूज नेटवर्क)
च्प्रवासी महिलेवर बलात्कार करणारा कॅबचालक शिवकुमार हा याआधीही बलात्काराच्या प्रकरणात तुरुंगात गेलेला आह़े
च्शिवकुमारविरुद्ध 2क्11 मध्ये दक्षिण दिल्लीच्या महरौली भागात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता़ याप्रकरणी तो सात महिने तुरुंगात होता़ आपल्याला यानंतर निदरेष सोडण्यात आले होते, असा दावा शिवकुमार सध्या करीत आह़े
च्‘उबर’ कॅब सव्र्हिस सेवेच्या एका चालकाने प्रवासी महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडल्यानंतर दिल्ली प्रशासनाने ‘उबर’च्या दिल्लीतील सर्व वाहतूक सेवांवर सोमवारी तात्काळ बंदी घातली. शिवाय या कंपनीला दिल्लीत कुठल्याही प्रकारच्या परिवहन सेवा उपलब्ध करून देण्यासंदर्भात ‘काळ्या यादीत’ टाकल़े
च्डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट उबर डॉट कॉम’च्या सर्व परिवहन सेवांवर तात्काळ बंदी घालण्यात आल्याचे दिल्ली प्रशासनाने म्हटले आह़े सूत्रंनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीपाठोपाठ देशभर या कंपनीच्या सेवांवर बंदी घालण्याचाही विचार केंद्र सरकार करीत आह़े