शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

लोकसभेपूर्वी देशात ‘CAA’ लागू होणार; गृहमंत्री अमित शाहांची घोषणा, लवकरच अधिसूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2024 05:33 IST

या कायद्यान्वये अल्पसंख्याक विशेषतः मुस्लिमांना त्यांचे नागरिकत्व हिरावून घेतले जाईल, असे सांगून भडकावले जात आहे

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वी देशभरात नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) लागू केला जाईल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी येथे केली. हा देशाचा कायदा असून त्याच्या अंमलबजावणीसाठी लवकरच अधिसूचना काढली जाईल, असेही ते म्हणाले. नवी दिल्ली येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

संसदेने डिसेंबर २०१९ मध्ये 'सीएए' कायद्याला मंजुरी दिली होती. हा कायदा लागू झाल्यानंतर कोणाचेही नागरिकत्व हिरावून घेतले जाणार नाही. या कायद्यान्वये अल्पसंख्याक विशेषतः मुस्लिमांना त्यांचे नागरिकत्व हिरावून घेतले जाईल, असे सांगून भडकावले जात आहे. परंतु, असे काही होणार नाही. कारण, तशी तरतूदच कायद्यात नाही, असे गृहमंत्री शाह यावेळी म्हणाले. 

‘सीएए’ कायदा काय आहे ?पाकिस्तान, अफगाणिस्तान व बांगलादेशमधून ३१ डिसेंबर २०१४ पूर्वी भारतात आलेल्या हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चनांसह अन्य पीडित गैरमुस्लीम स्थलांतरितांना भारताचे नागरिकत्व देण्यासाठी हा कायदा आला. त्यासाठी १९५५ च्या नागरिकत्व कायद्यात बदल केला.

कसा आला कायदा अस्तित्वात?२०१६ मध्ये नागरिकत्व सुधारणा विधेयक (सीएए) सादर करण्यात आले. १२ ऑगस्ट २०१६ रोजी ते संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आले.  समितीने ७ जानेवारी २०१९ रोजी त्याबाबतचा अहवाल सादर केला. ९ डिसेंबर २०१९ रोजी सीएए विधेयक लोकसभेत ३११ विरुद्ध ८० मतांनी मंजूर झाले. त्यानंतर ११ डिसेंबर २०१९ रोजी ते राज्यसभेत १२५ विरुद्ध ९९ मतांनी मंजूर झाले. १२ डिसेंबर २०१९ रोजी राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केल्यानंतर कायद्याला मंजुरी मिळाली.

काँग्रेस सरकारने सीएए लागू करण्याचे आश्वासन दिले होते. अत्याचार होत असलेल्या इतर देशांतील अल्पसंख्याक निर्वासितांना काँग्रेसने भारतात येण्याचे आमंत्रण देत नागरिकत्व देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र आता काँग्रेस आपला शब्द फिरवत आहे.     - अमित शाह, गृहमंत्री 

मंत्री ठाकूर यांनी दिले होते संकेत

अलीकडेच केंद्रीय मंत्री शंतनू ठाकूर यांनी सीएएच्या अंमलबजावणीचे संकेत दिले होते. दक्षिण २४ परगणामधील काकद्वीप येथे एका सभेला संबोधित करताना येत्या सात दिवसांत सीएए देशभर लागू होईल, अशी मी हमी देतो, असे ते म्हणाले होते. 

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकAmit Shahअमित शाह