शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

'सीएए'ला घाबरण्याची गरज नाही, मोदींच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2020 19:17 IST

सीएए, एनपीआर याबाबतही नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा झाल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 

ठळक मुद्दे'सीएएवरून कोणाला घाबरण्याची गरज नाही.'मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच दिल्ली दौराकाँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही भेट घेणार आहेत

नवी दिल्ली: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे सुद्धा उपस्थित होते. पंतधान नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. 

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत राज्याशी संबंधित अनेक विषयावर चर्चा झाल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच, नरेंद्र मोदींनी राज्यातील चांगल्या गोष्टी असतील, त्यामध्ये केंद्राचे सहकार्य असेल, असे आश्वासन दिल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. याशिवाय, सीएए, एनसीआर याबाबतही नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा झाल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. सीएएवरून कोणाला घाबरण्याची गरज नाही. एनसीआर फक्त आसाम पुरते मर्यादित असून संपूर्ण देशात लागू होणार नाही, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी एकप्रकारे सीएएला समर्थन दिल्याचे समजते.

याशिवाय, राज्यातील जीएसटी, शेतकऱ्यांच्या मुद्दयांवरही चर्चा झाल्याचे सांगितले. जीएसटीचा पैसा येत आहे, मात्र ज्या वेगात यायला हवा त्या वेगात येत नाही. शेतकरी विम्याबाबतही चर्चा केली. जीएसटीचे पैसे येत आहेत. मध्ये मी पत्र लिहिले तेव्हा काही पैसे आले आहेत, मात्र हे पैसे येण्याचा वेग वाढायला हवा. आम्ही शेतकऱ्यांसाठी योजना आणत आहोत. त्यासाठी पैसा लागणार आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे. नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे नेते लालकृष्ण अडवाणी आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही भेट घेणार आहेत. उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांची ही पहिलीच भेट असणार आहे. 

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आदित्य ठाकरे दिल्लीत जाऊन सोनिया गांधी यांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिले होते. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या भेटीगाठी औपचारिक असल्याचे सांगण्यात येत असले तरी सोनिया गांधी यांच्या भेटीत शिवसेनेला संपुआत घेण्यावर चर्चा होऊ शकते.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदी