आंदोलनाचा पर्यटन उद्योगाला मोठा फटका, पर्यटकांचा ओघ आटणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 05:27 AM2019-12-23T05:27:44+5:302019-12-23T05:28:31+5:30

पर्यटकांचा ओघ आटणार; अनेक देशांनी भारताला पर्यटनासाठी असुरक्षित देश केले घोषित

The CAA agitation is a major blow to the tourism industry | आंदोलनाचा पर्यटन उद्योगाला मोठा फटका, पर्यटकांचा ओघ आटणार

आंदोलनाचा पर्यटन उद्योगाला मोठा फटका, पर्यटकांचा ओघ आटणार

Next

कोलकाता : सीएए आणि एनआरसी यावरून देशात निर्माण झालेल्या संघर्षाचा मोठा फटका पर्यटन उद्योगाला बसत आहे. अनेक देशांनी भारताला प्रवासासाठी असुरक्षित देश घोषित केले आहे. त्यामुळे ऐन सुट्यांच्या हंगामात विदेशी पर्यटकांचा ओघ आटण्याची भीती निर्माण झाली आहे. भारतीय पर्यटकही देशांतर्गत पर्यटन करण्यापेक्षा विदेशी जाण्याचा पर्याय निवडण्याचा विचार करीत आहेत.

‘बुकिंग केलेल्या विदेशी पर्यटकांकडून आम्हाला परिस्थितीची विचारणा करणारे फोन येत आहेत. बुकिंग रद्द करण्याचे अथवा प्रवास पुढे ढकलण्याचे प्रकार अजून फार मोठ्या प्रमाणात घडलेले नाहीत. तथापि, वातावरण न निवळल्यास बुकिंग रद्दच होऊ शकतात, असे ट्रॅव्हल एंजटस् असोसिएशनच्या अध्यक्ष ज्योती मायल यांनी सांगितले. अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, संयुक्त अरब अमिरात आणि आॅस्ट्रेलिया या देशांनी आपल्या पर्यटकांसाठी सल्लापत्र जारी करून भारतात प्रवास टाळण्याचा व विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

केरळच्या मुख्यमंत्र्यांवर केंद्रीय मंत्र्यांची टीका
1 तिरुवनंतपुरम : नागरिकत्व कायद्याविरुद्ध सुरू असलेल्या आंदोलनावरून केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन आणि राज्यातील काँग्रेसचे नेते रमेश चेन्नीथला यांच्यावर टीका करीत केंद्रीय परराष्ट्रमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी म्हटले आहे की, हे आंदोलन रस्त्यांवर घेऊन जाणे हे अराजकवाद्यांचे वैशिष्ट्य आहे.
2 केरळात काँग्रेस आणि डाव्यांनी अलीकडेच सीएएविरुद्ध संयुक्त आंदोलन केले होते. यावेळी त्यांनी भाजपच्या नेतृत्वातील रालोआ, संघ परिवारावर टीका केली होती.

3 मुरलीधरन म्हणाले की, केरळच्या मुख्यमंत्र्यांना जर या कायद्याबाबत काही शंका असतील, तर त्यांनी यावर चर्चा करावी; पण हे आंदोलन रस्त्यांवर घेऊन जाणे अराजकवाद्यांचे वैशिष्ट्य आहे. जेव्हा संवैधानिक पदांवर बसलेले लोक अराजकवादी बनण्याचा प्रयत्न करतात तेव्हा कायदा सुव्यवस्थेसाठी त्यांच्याशी कोण संपर्क करील.

Web Title: The CAA agitation is a major blow to the tourism industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.