Bypoll Results: देशातील १४ पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेसला 'अच्छे दिन', भाजपाचं 'कमळ' कोमेजलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2018 12:08 PM2018-05-31T12:08:16+5:302018-05-31T18:37:42+5:30

देशभरातल्या १४ मतदारसंघांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीच्या निकालातून राजकीय पक्षांना आपण किती पाण्यात आणि किती खोलात आहोत, हे कळणार आहे.

Bypoll Results: who is ahead in 14 constituencies in the country | Bypoll Results: देशातील १४ पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेसला 'अच्छे दिन', भाजपाचं 'कमळ' कोमेजलं!

Bypoll Results: देशातील १४ पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेसला 'अच्छे दिन', भाजपाचं 'कमळ' कोमेजलं!

Next

नवी दिल्लीः लोकसभेच्या चार आणि विविध राज्यांतील विधानसभांच्या १० मतदारसंघांच्या पोटनिवडणुकांचे निकाल आज जाहीर झालेत. त्यापैकी पालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघांकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं असलं, तरी इतर मतदारसंघातील लढतींवरूनही भाजपा आणि काँग्रेसच्या ताकदीचा अंदाज बांधला जाणार आहे. स्वाभाविकच, राजकीय जाणकारांचं लक्ष १४ जागांवर आहे. 

महाराष्ट्रातील पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांचे चिरंजीव विश्वजीत कदम यांच्याविरोधात कुणीच उमेदवार न दिल्यानं या मतदारसंघात मतदान झालं नव्हतं. विश्वजीत कदम बिनविरोध विजयी झालेत. ही जागा वगळता, इतर १४ ठिकाणी काय चित्र आहे, यावर एक दृष्टिक्षेप... 

लोकसभा पोटनिवडणूक निकाल

कैराना - राष्ट्रीय लोक दलाच्या तबस्सूम हसन विजयी. मृगांका सिंह यांचा केला पराभव. काँग्रेस-सपा-बसपा-रालोद एकीने मोदी-शहा-योगी त्रिकुटाला मोठा धक्का. 

पालघर - भाजपाचे उमेदवारी राजेंद्र गावित विजयी. शिवसेना उमेदवार श्रीनिवास वनगा दुसऱ्या स्थानावर (जाणून घ्या अपडेट्स)

भंडारा-गोंदिया - राष्ट्रवादी काँग्रेस मधुकर कुकडे यांची विजयी घोडदौड कायम, भाजपाचे हेमंत पटले पिछाडीवर. (जाणून घ्या अपडेट्स)

नागालँड - नागालँड विधानसभेतील सत्ताधारी नागा पीपल्स फ्रंट आघाडीवर. 

विधानसभा पोटनिवडणूक निकाल

नूरपूर (उत्तर प्रदेश) - समाजवादी पार्टी विजयी
शाहकोट (पंजाब) - काँग्रेस विजयी
जोकीहाट (बिहार) - राष्ट्रीय जनता दल विजयी
गोमिया (झारखंड) -  झारखंड मुक्ती मोर्चा विजयी
सिल्ली (झारखंड) - झारखंड मुक्ती मोर्चा विजयी
चेनगन्नूर (केरळ) - माकपा विजयी
राजराजेश्वरी नगर (कर्नाटक) - काँग्रेस विजयी
अम्पाती (मेघालय) - काँग्रेस विजयी
थराली (उत्तराखंड) -  भाजपा विजयी
महेशताला (पश्चिम बंगाल) - तृणमूल काँग्रेस विजयी

Web Title: Bypoll Results: who is ahead in 14 constituencies in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.