पोटनिवडणुका शांततेत
By Admin | Updated: September 14, 2014 03:02 IST2014-09-14T03:02:57+5:302014-09-14T03:02:57+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेची परीक्षा म्हणून पाहिले जात असलेल्या लोकसभेच्या 3 व विधानसभेच्या 33 जागांच्या पोटनिवडणुका शनिवारी शांततेत पार पडल्या. या वेळी सरासरी 5क् टक्के मतदान झाले.

पोटनिवडणुका शांततेत
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेची परीक्षा म्हणून पाहिले जात असलेल्या लोकसभेच्या 3 व विधानसभेच्या 33 जागांच्या पोटनिवडणुका शनिवारी शांततेत पार पडल्या. या वेळी सरासरी 5क् टक्के मतदान झाले.
उत्तर प्रदेशात लोकसभेच्या एका आणि विधानसभेच्या11 जागांसाठी सरासरी 53 टक्के तर गुजरातेत लोकसभेच्या एका आणि विधानसभेच्या 9 जागांसाठी सरासरी 49 टक्के मतदान झाल़े उत्तर प्रदेशातील मैनपुरी (53़2}), गुजरातेतील वडोदरा (33़5 }) व तेलंगणा या नवनिर्मित राज्यातील मेंडक (63़3}) अशा तीन लोकसभा जागांसाठीही आज पोटनिवडणुकीचे मतदान पार पडल़े उत्तर प्रदेशातील 11 (49़8}), गुजरातेतील 9, राजस्थानात 4 (66.2}), आसामात 3 (7क्}), पश्चिम बंगालमधील 2 तर सिक्कीम, त्रिपुरा (87 }), आंध्र प्रदेश (63}) आणि छत्तीसगड (5क्}) येथील प्रत्येकी एका विधानसभा जागेसाठीही आज पोटनिवडणुकीचे मतदान झाल़े