गोमूत्र ऑनलाइन विकत घ्या

By Admin | Updated: May 10, 2016 19:24 IST2016-05-10T19:24:36+5:302016-05-10T19:24:36+5:30

अन्य उत्पादनांप्रमाणे बिग बास्केट माँ गौ प्रोडक्टसच्या उत्पादनाचा साठा करुन ठेवणार नव्हते. मागणीनुसार बिग बास्केट कंपनीकडून उत्पादने उपलब्ध करुन देणार होते.

Buy cow urine online | गोमूत्र ऑनलाइन विकत घ्या

गोमूत्र ऑनलाइन विकत घ्या

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १० - बंगळुरु स्थित माँ गौ प्रोडक्टसने सप्टेंबर महिन्यात गायीच्या गोमूत्रावर आधारीत आपल्या उत्पादनाच्या विक्रीसाठी बिग बास्केट या ऑनलाइन सुपर मार्केटशी संपर्क साधला. त्यावेळी बिग बास्केटने प्रायोगिक तत्वावर विक्री करण्याची तयारी दाखवली होती. 
 
अन्य उत्पादनांप्रमाणे बिग बास्केट माँ गौ प्रोडक्टसच्या उत्पादनाचा साठा करुन ठेवणार नव्हते. मागणीनुसार बिग बास्केट कंपनीकडून उत्पादने उपलब्ध करुन देणार होते. टूथ पावडर, फ्लोअर क्लीनर, मलम, फेसपॅक अशी उत्पादने होती. पण महिन्याभरातच या माँ गैौ च्या उत्पादनांना जोरदार प्रतिसाद मिळाला. 
 
बंगळुरुमधील महिन्याची विक्री लाखाच्या पुढे आहे. ग्राहकांचा हा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन बिग बास्केटने माँ गौ च्या उत्पादनांचा साठा करण्याचा निर्णय घेतला असून, बिग बास्केटच्या अन्य शाखांमध्येही ही उत्पादने आता उपलब्ध होणार आहेत. पाच अनुभवी व्यावसायिकांनी एकत्र येऊन २०११ मध्ये १.२ कोटी रुपयांच्या भांडवलावर माँ गौ कंपनीची स्थापना केली. 
 

Web Title: Buy cow urine online