बुद्धिस्ट स्टडीच काम रखडलेलेच -२
By Admin | Updated: February 13, 2015 00:38 IST2015-02-13T00:38:25+5:302015-02-13T00:38:25+5:30
तेव्हा कुलगुरूंनी विद्यापीठाच्या इंजिनियरला इमारतीचे काम तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले होते. त्यालाही आता महिना लोटला आहे. परंतु विद्यापीठ प्रशासनातर्फे बुद्धिस्ट स्टडीच्या इमारतीच्या कामाबाबत कुठलीही हालचाल सुरू झालेली नाही.

बुद्धिस्ट स्टडीच काम रखडलेलेच -२
त व्हा कुलगुरूंनी विद्यापीठाच्या इंजिनियरला इमारतीचे काम तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले होते. त्यालाही आता महिना लोटला आहे. परंतु विद्यापीठ प्रशासनातर्फे बुद्धिस्ट स्टडीच्या इमारतीच्या कामाबाबत कुठलीही हालचाल सुरू झालेली नाही. बॉक्स.. देशातील एकमेव उदाहरण बौद्ध आंबेडकरी तत्त्वज्ञान आणि संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठांतर्गत विविध विभाग कार्यरत आहेत. यामध्ये पाली-पाकृत विभाग, आंबेडकर विचारधारा विभाग आणि डॉ. आंबेडकर अध्यासन हे प्रमुख विभाग आहेत. हे तिन्ही विभाग विद्यार्थ्यांनी हाऊसफुल्ल असे आहेत. याशिवाय हे तिन्ही विभाग दीक्षाभूमीजवळ असून एकाच परिसरात एकमेकांना लागून आहेत. बुद्धिस्ट स्टडी सेंटर हे सुद्धा याच परिसरात होणार आहे. त्यामुळे अशाप्रकारचे केंद्र हे देशातील एकमेव केंद्र ठरणार आहे. बुद्धिस्ट स्टडीचे क्लासेस सुरू झाले आहेत. विद्यार्थ्यांना बसायला जागा नाही. त्यामुळे पाली-पाकृत विभागात त्यांचे वर्ग सुरू आहेत. इमारतीचे कामच सुरू झाले नसल्याने पुढील अभ्यासक्रमावरही परिणाम होतो आहे. तसेच इमारतीच्या कामाला उश्ीार होत असल्याने इमारतीला लागणाऱ्या खर्चातही वाढ होणार आहे, तेव्हा याकडे विद्यापीठाने तातडीने लक्ष द्यावे. डॉ. बालचंद्र खांडेकर अध्यक्ष -पाली-प्राकृत अभ्यास मंडळ व ॲकेडेमिक कौन्सिलचे सदस्य