शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

हिमाचल प्रदेशमध्ये मोठा अपघात! HRTC ची बस ३०० फूट दरीत कोसळली; ४० प्रवासी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2023 15:23 IST

Mandi Bus Accident : चाळीस प्रवाशांना घेऊन जाणारी HRTC ची बस ३०० फूट दरीत कोसळली.

हिमाचल प्रदेशच्या मंडी जिल्ह्यात हिमाचल रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनच्या (HRTC) बसचा मोठा अपघात झाला आहे. चाळीस प्रवाशांना घेऊन जाणारी HRTC ची बस ३०० फूट दरीत कोसळली. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला असून उर्वरित लोकांना किरकोळ दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. रस्त्यावरून खाली कोसळल्यानंतर सुदैवाने बस झाडाला जाऊन थडकली अन् मोठा अपघात टळला. बस कारसोगहून मेहंदी ज्वालापूरकडे जात होती.

दरम्यान, स्थानिक खरोडी गावाच्या ठिकाणी बसचे नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या खाली गेली. बस खाली पडल्याचे पाहून आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना आपल्या वाहनांतून जवळच्या कारसोग रुग्णालयात नेले. जखमींमध्ये फक्त चालकाला जास्त दुखापत झाली आहे. उर्वरित जखमींना किरकोळ जखमा झाल्या आहेत. प्रशासनाचे अधिकारी येण्यापूर्वीच स्थानिक लोकांनी जखमींना बाहेर काढून त्यांच्याच वाहनातून रुग्णालयात नेले.

स्थानिकांचा प्रशासनावर आरोप महामंडळाच्या बसेसच्या दररोज ब्रेकडाउन होत असून रस्त्याच्या कडेला पॅरापेटची व्यवस्था नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. दुसरीकडे तहसीलदार कैलाश कौंडल यांनी सांगितले की, बस अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताचे कारणही तपासले जात आहे. 

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशAccidentअपघातBus Driverबसचालकhospitalहॉस्पिटल