चोरून नेलेली बस नाशिकच्या शिंदेगावात
By Admin | Updated: March 19, 2015 22:35 IST2015-03-19T22:35:59+5:302015-03-19T22:35:59+5:30

चोरून नेलेली बस नाशिकच्या शिंदेगावात
> बस घेऊन पोलिस व पीएमपी पथक मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात पुणे : सुरक्षा रक्षकासमोरच पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी)चोरून नेलेली बस (क्र. एम एच १२ एफ सी ३१२५) नाशिकपासून दहा किलोमीटर अंतरावरील शिंदेगावात लावून ठेवल्याचे नाशिक पोलिसांना रात्री बारानंतर आढळून आली. ही बहुचर्चित बस घेऊन पुणे पोलिस व पीएमपीच्या पथकाने आज रात्री ही बस मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात नेऊन उभी केली. बस पळवून नेल्याची माहिती पुणे पोलिसांनी राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना बिनतारी संदेशाद्वारे कळविली होती. दूरचित्रवाहिन्यांवरुनही बस चोरीला गेल्याची बातमी प्रसारित होत होती. नाशिक - सिन्नर रस्त्यावरील शिंदेगावात ही बस उभी असल्याचे स्थानिक नागरिकांना दिसून आले. त्यांनी पोलिस नियंत्रण कक्षाला ही माहिती कळविली. नाशिक पोलिसांनी खातरजमा करून पुणे पोलिस आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षाला ही माहिती कळविली. मार्केटयार्ड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक एस. एम.बाबर यांनी वरिष्ठ अधिका-यांना याबाबत कळवून पीएमपीच्या सुत्रांनाही जागे केले. लागोलाग पीएमपी व पोलिसांचे पथक नाशिककडे रवाना करण्यात आले. ही बस घेऊन हे पथक रात्री पुण्याकडे रवाना झाले.वरिष्ठ निरिक्षक एस. एम.बाबर म्हणाले संशयिताचा शोध लागलेला नाही. सी.सी.टिव्हिचे फुटेज तपासण्याचे काम सुरु आहे. बसमधील ठशांवरुनहि आम्ही तपास करु. मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे रात्री डेपोच्या समोर ही बस पार्क केली होती. त्यावेळी डेपोत रखवालीकरीता ३ वॉचमन होते. रात्री पावणे दोनच्या सुमारास एक बस सुरू करण्यात आल्याचे एका सुरक्षारक्षकाच्या लक्षात आले. पाठलाग करुनही चोरटा व बस हाती लागली नाही.