पुरात बस अडकली

By Admin | Updated: August 11, 2015 23:16 IST2015-08-11T23:16:07+5:302015-08-11T23:16:07+5:30

पुरात बस अडकली

The bus stuck in the air | पुरात बस अडकली

पुरात बस अडकली

रात बस अडकली
पुरात बस अडकली
३० कर्मचारी बचावले : शिवा येथील घटना
बाजारगाव : कंपनीतून ३० कर्मचाऱ्यांना घेऊन परत येणारी बस पुरात अडकली. प्रसंगावधान राखून कर्मचारी बसच्या टपवर चढले आणि त्यानंतर बचाव पथकाने त्यांना सुखरूप काढले. ही घटना बाजारगावजवळील शिवा येथे मंगळवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.
बाजारगावनजीकच्या शिवा येथे एकॉनॉमिक एक्स्प्लोझिव्ह कंपनी आहे. तेथील कर्मचाऱ्यांना ने-आण करण्यासाठी स्टाफ बसचा वापर केला जातो. नेहमीप्रमाणे मंगळवारी सुटी झाल्यानंतर कर्मचारी एमएच-४०/वाय-६८६३ क्रमांकाच्या बसमध्ये येण्यासाठी निघाले. कंपनीपासून थोड्या अंतरावर शिवा गावाजवळील बोर (शिवा) नदीला पूर आलेला होता. मात्र पहिली स्टाफ बस तेथून निघाल्याने सदर बसचालकानेही बस काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पुराची पातळी वाढल्याने बस पुरात अडकली. ही बाब बसमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी कसातरी मार्ग काढला आणि ते सर्व बसच्या टपावर जाऊन बसले. ही बाब परिसरातील नागरिकांना माहीत होताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. यासोबतच कोंढाळी पोलिसांना याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. त्यानंतर बचाव पथकाने सर्व कर्मचाऱ्यांना पुरात अडकलेल्या बसमधून बाहेर काढले.
बचाव पथकात कोंढाळीचे ठाणेदार पीतांबर जाधव, पोलीस उपनिरीक्षक गीतेश कानपुरे, सोनाली गोरे, विजय जव्हाड या पोलीस कर्मचाऱ्यांसह राहुल शेंडे आणि इतरांचा समावेश होता. रात्री उशिरापर्यंत बस पुरात अडकूनच होती. (वार्ताहर)

Web Title: The bus stuck in the air

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.