ओडिशात बस उलटून ४० जखमी

By Admin | Updated: January 25, 2017 03:17 IST2017-01-25T03:17:38+5:302017-01-25T03:17:38+5:30

पश्चिम बंगालच्या पर्यटकांची बस उलटून ४० जण जखमी झाले असून, त्यातील सहा जणांची प्रकृती गंभीर आहे.

Bus reaches 40 in Odisha | ओडिशात बस उलटून ४० जखमी

ओडिशात बस उलटून ४० जखमी

भुवनेश्वर : पश्चिम बंगालच्या पर्यटकांची बस उलटून ४० जण जखमी झाले असून, त्यातील सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. धौली हिल्स भागात मंगळवारी सकाळी ही दुर्घटना घडली. बसमध्ये बंगालच्या मिदनापूर भागातील ६५ पर्यटक होते. वाहनचालकाचे नियंत्रण सुटून बस उलटली. जखमींत १५ महिला आणि चार बालकांचा समावेश आहे. ६ गंभीर जखमींना कटक येथील एससीबी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल केले आहे. जखमींना उपचार मिळावेत यासाठी आठ डॉक्टरांचे पथक स्थापन केल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Web Title: Bus reaches 40 in Odisha