बस चालकाला अटक व सुटका
By Admin | Updated: March 22, 2016 00:41 IST2016-03-22T00:41:29+5:302016-03-22T00:41:29+5:30
जळगाव : बस स्थानकाजवळील चिमुकले राममंदिरासमोर रविवारी दुपारी झालेल्या अपघातप्रकरणी जिल्हापेठ पोलिसांनी बस चालक मलीक मुस्तफा अब्दुल सत्तार (वय ५५, रा.चोपडा) यास २० रोजी रात्री ९.१० वाजता अटक केली होती. सोमवारी न्यायालयाने त्याची सुटका केली. अटकेनंतर मलीक मुस्तफा याला सोमवारी दुपारी मुख्य न्यायदंडाधिकार्यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याची १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका केली. आरोपीतर्फे ॲड.अकिल इस्माइल यांनी कामकाज पाहिले.

बस चालकाला अटक व सुटका
ज गाव : बस स्थानकाजवळील चिमुकले राममंदिरासमोर रविवारी दुपारी झालेल्या अपघातप्रकरणी जिल्हापेठ पोलिसांनी बस चालक मलीक मुस्तफा अब्दुल सत्तार (वय ५५, रा.चोपडा) यास २० रोजी रात्री ९.१० वाजता अटक केली होती. सोमवारी न्यायालयाने त्याची सुटका केली. अटकेनंतर मलीक मुस्तफा याला सोमवारी दुपारी मुख्य न्यायदंडाधिकार्यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याची १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका केली. आरोपीतर्फे ॲड.अकिल इस्माइल यांनी कामकाज पाहिले.