आसाममध्ये दरीत कोसळली बस, 29 जणांचा मृत्यू, 9 जखमी
By Admin | Updated: June 15, 2016 19:53 IST2016-06-15T19:53:16+5:302016-06-15T19:53:16+5:30
आसाममधल्या सोनापूर इथं रात्रीच्या सुमारास एक बस खोल दरीत कोसळली आहे.

आसाममध्ये दरीत कोसळली बस, 29 जणांचा मृत्यू, 9 जखमी
ऑनलाइन लोकमत
गुवाहाटी, दि. 15 - आसाममधल्या सोनापूर इथं रात्रीच्या सुमारास एक बस खोल दरीत कोसळली आहे. या बस अपघातात आतापर्यंत 29 जणांना मृत्यू झाला आहे. तर 9 जण गंभीर जखमी आहेत. मृतांची संख्या वाढण्याचा शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
मंगळवारी रात्रीच्या सुमारास ही बस सिलचरहून गुवाहाटीला जात होती. मात्र सोनापूर मंदिरच्या घाटावर ती दरीत कोसळली. रात्रीच्या सुमारास एका व्यक्तीनं 108 नंबरवर कॉल करून अँब्युलन्सला मदतीसाठी बोलावले. बीएसएफ आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
बसमधील बहुतेक लोक मृत्युमुखी पडल्याची प्राथमिक माहिती आता पोलिसांनी दिली आहे. 500 फूट खोल दरीत बस कोसळल्यानं सुरक्षा दलांनाही बचावकार्यात अडथळा येत आहे. या परिसर खूपच घसरंडीचा असल्याचीही माहिती आता समोर येते आहे.