शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

दिल्लीहून बिहारला जाणाऱ्या बस अन् ट्रकचा भीषण अपघात, 16 जणांचा मृत्यू, 35 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 7:42 AM

दिल्लीहून बिहारला जाणाऱ्या स्लीपर बसनं आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वेवर बुधवारी रात्री एका ट्रकला धडक दिली.

नवी दिल्लीः दिल्लीहून बिहारला जाणाऱ्या स्लीपर बसनं आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वेवर बुधवारी रात्री एका ट्रकला धडक दिली. या अपघातात 16 जणांचा मृत्यू झाला असून, 35 प्रवासी जखमी आहेत. जखमींना सेफई पीजीआय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बसमधून 90 जण प्रवास करत होते.  खासगी बस जेव्हा एक्स्प्रेस वेवर भदाव गावाजवळ पोहोचली, तेव्हा चालकाचा बसवरील ताबा सुटला. बस अनियंत्रित झाल्यानं पुढच्या ट्रकवर जाऊन धडकली. त्यानंतर मोठा आवाज झाला. तात्काळ स्थानिकांनी बचावकार्य सुरू केलं आणि पोलिसांना या अपघाताची सूचना दिली.  अपघात झालेल्या घटनास्थळी पोलीस पोहोचले असून, एडीजी झोनचे अजय आनंद आणि आयजी रेंजचे ए. सतीश गणेश घटनास्थळाची पाहणी करत आहेत. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची ओळख पटवता आलेली नाही. अपघातामुळे बसचा पुढचा भागाचा पत्रा तुटला आहे. घटनास्थळी स्थानिकांनी पोलिसांच्या मदतीनं बचावकार्य सुरू केलं आहे.  जखमींना अँब्युलन्समधून पीजीआय सेफई रुग्णालयात पाठवण्यात आलं. तीन जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. थोड्या वेळानं आणखी एकानं प्राण सोडले. सेफई रुग्णालयात हलवण्यात आलेल्या 35 जखमींपैकी सहा जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, अपघातस्थळी आरडाओरडा सुरू होता. त्यानंतर जवळपासच्या लोकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी बस दुर्घटनेतील जखमींसाठी तात्काळ बचावकार्य राबवण्याचे निर्देश दिले आहेत. एडीजी झोनचे अजय आनंद आणि आयजी रेंजचे ए. सतीश गणेश घटनास्थळी दाखल झालेले आहेत.