शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
4
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
5
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
6
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
7
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
8
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
9
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
10
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
11
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
12
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
13
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
14
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
15
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
16
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
17
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
18
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
19
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
20
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी

MP Bus Accident: मध्य प्रदेशात बसला भीषण अपघात; ३९ जणांचा मृत्यू तर इतरांचा शोध सुरू

By प्रविण मरगळे | Updated: February 16, 2021 14:25 IST

Madhya Pradesh Sidhi Bus Accident News:परिवहन मंत्री गोविंद सिंह राजपूत यांनी घटनेची माहिती मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान(CM Shivraj Singh Chouhan) यांना दिली आहे.

भोपाळ – मध्य प्रदेशातील सीधी येथे बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आतापर्यंत ३९ जणांचा मृतदेह सापडला आहे. मृतकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान सरकारने सर्व कार्यक्रम स्थगित केले असून मयताच्या कुटुंबीयांना ५ लाख रूपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे. मध्य प्रदेश सरकारचे मंत्री तुलसीराम सिलावट आणि रामखेलावान पटेल हे दोघंही घटनास्थळी रवाना झाले आहेत. (Several died while several others remained missing after a bus fell off a bridge into a canal in Madhya Pradesh's Sidhi district)

परिवहन मंत्री गोविंद सिंह राजपूत यांनी घटनेची माहिती मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान(CM Shivraj Singh Chouhan) यांना दिली आहे. स्थानिक लोकांच्या माहितीनुसार या बसमध्ये ५५ ते ६० प्रवाशी प्रवास करत होते, यातील ७ जणांना जिवंत वाचवण्यात यश आलं आहे. आतापर्यंत ३९ जणांचा मृतदेह सापडला आहे. छुहिया घाट परिसरात वाहतूक कोंडी असल्याने बसने मार्ग बदलला, त्यानंतर पूलाजवळ असलेल्या खड्ड्यामुळे चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि बस खाली कालव्यात कोसळली.

 

हा कालवा खूप मोठा आहे, त्यामुळे तातडीने बंधाऱ्यातून सोडण्यात येणारं पाणी बंद करण्यात आलं आहे, बचावकार्यासाठी शोधपथक रवाना केले आहेत, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि एसडीआरएफ टीम घटनास्थळी पोहचली आहे, बस बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. सध्या घटनास्थळी शोधकार्य सुरू आहे. बसमध्ये सर्वाधिक नर्सिंगचे विद्यार्थी होते, जे परीक्षा देण्यासाठी सीधी ते सतना जात होते, परंतु या बस अपघातात विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात जीव गेला.

दरम्यान, या बसमध्ये नेमके किती प्रवाशी होते त्याची अधिकृत माहिती समोर आली नाही. स्थानिक लोकांनी प्रशासनावर मदत उशीरा पाठवल्याचा आरोप केला आहे. परिवहन मंत्री गोविंद सिंह राजपूत यांनी बसचा परवाना रद्द केला आहे, बसमध्ये विद्यार्थी परीक्षेला जात होते, चुकीच्या मार्गाने बस जात होती, परिवहन आयुक्त या संपूर्ण अपघाताची सखोल चौकशी करतील आणि दोषींवर योग्य ती कठोर कारवाई केली जाईल असं परिवहन मंत्र्यांनी सांगितले आहे. सध्या रेस्क्यू ऑपरेशन सुरू असल्याची माहिती आहे.

टॅग्स :AccidentअपघातMadhya Pradeshमध्य प्रदेशshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहान