शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

30 जूनला आपल्याला देवाची भेट घडेल; 11 मृतदेह सापडलेल्या घरातील रजिस्टरनं एकच खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2018 10:50 IST

30 जूनच्या रात्रीच एकाच घरात आढळून आले 11 मृतदेह

दिल्ली: एकाच घरात 11 मृतदेह आढळून आल्यानं काल देशाची राजधानी हादरून गेली. एकाच कुटुंबातील 11 जणांचे मृतदेह सापडल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली. यातील 10 जणांचे मृतदेह हॉलमध्ये लटकलेल्या अवस्थेत सापडले. तर एक मृतदेह दुसऱ्या खोलीत आढळून आला. मृतांमध्ये सात महिला, दोन पुरुष आणि दोन मुलांचा समावेश आहे. पोलिसांनी घरातील कागदपत्रांचा तपास केला असून त्यामधून समोर आलेली माहिती अतिशय धक्कादायक आहे. बुरारीमधील एकाच घरात काल 11 मृतदेह सापडले. अंधश्रद्धेतून या कुटुंबानं स्वत:ला संपवलं असावं, अशी प्राथमिक शक्यता तपासातून पुढे येत आहे. पोलिसांना या घरात दोन रजिस्टर आढळून आले आहेत. यामध्ये अलौकिक शक्ती, मोक्षप्राप्तीसाठी मृत्यू हाच एकमेव मार्ग, आत्मा आणि अध्यात्म यांचा परस्परांशी असलेला संबंध अशा स्वरुपाचा मजकूर आढळून आला आहे. या रजिस्टरमधील शेवटची नोंद ही 26 जूनला झाली आहे. 'आपण 30 जूनला देवाला भेटणार आहोत. देवाच्या भेटीसाठी आपण सर्व हात, पाय, तोंड पूर्णपणे बांधू,' असा मजकूर रजिस्टरमध्ये आहे. या प्रकरणाचा तपास दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून सुरू आहे. तपास पथकाला घरातील रजिस्टरमध्ये अनेक धक्कादायक गोष्टी आढळून आल्या आहेत. 'मोक्ष प्राप्त करण्यासाठी आपल्याला जीवनाचा त्याग करायला हवा. जीवनाचा त्याग करण्यासाठी आपल्याला मरणाला कवटाळायला हवं. आयुष्य संपवताना थोडा त्रास होईल. मात्र कष्टातून, त्रासातून सुटका करुन घेण्यासाठी डोळे बंद करायला हवेत,' असा मजकूर रजिस्टारमध्ये सापडला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही रजिस्टरमधील काही पानांमधील माहिती धक्कादायक आहे. कोणत्या व्यक्तीनं कुठे लटकायला हवं, याचा तपशील रजिस्टरमध्ये आहे. कुटुंबातील कोणत्या व्यक्तीनं कुठे लटकूवन जीव द्यावा, याची नोंद रजिस्टरमध्ये आहे. घरात आढळलेले मृतदेह अगदी रजिस्टरमध्ये केलेल्या नोंदीनुसार लटकलेल्या अवस्थेत सापडल्यानं पोलिसही आश्चर्य व्यक्त करत आहेत.   

टॅग्स :delhiदिल्लीCrimeगुन्हाSuicideआत्महत्याMurderखून