शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

Burari Death : 11 पाईप, 11 खिडक्या आणि 11 मृतदेह; फक्त योगायोग की नियोजन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2018 16:44 IST

11 फॅक्टरचा पोलिसांकडून शोध सुरू

नवी दिल्ली : दिल्लीतील बुरारीमधील एकाच घरात 11 मृतदेह आढळल्यानं एकच खळबळ माजली. या प्रकरणाचा तपास दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून सुरू आहे. एका स्वयंघोषित बाबाच्या आहारी जाऊन कुटुंबानं आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी आधी व्यक्त केला होता. मात्र आता या कुटुंबातील सर्वात लहान मुलगा असलेला ललितच या आत्महत्यांसाठी जबाबदार असल्याची शक्यता पोलीस व्यक्त करत आहेत. याशिवाय  दिल्लीतील बुरारीमधील संतनगरमध्ये झालेल्या आत्महत्यांमागे अंधश्रद्धा हे प्रमुख कारण असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. मोक्षप्राप्तीसाठी या कुटुंबानं स्वत:चं जीवन संपवलं असावं, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. घरात सापडलेल्या दोन रजिस्टरमध्ये मरण आणि त्यानंतर होणारी मोक्षप्राप्ती असा मजकूरही पोलिसांना सापडला आहे. घरातील 11 मृतदेहांमागील 11 या आकड्यानं पोलिसांना कोड्यात टाकलं आहे. पोलिसांना तपासादरम्यान घराच्या भिंतीत 11 पाईप आढळून आले आहेत. हे 11 पाईप घराच्या भिंतीतून बाहेर पडले आहेत. विशेष म्हणजे हे पाईप एकमेकांच्या अतिशय जवळ लावण्यात आले आहेत. हे पाईप नेमके कशासाठी लावण्यात आले होते, याचा शोध सध्या पोलिसांकडून सुरू आहे. यातील सात पाईप सरळ, तर चार पाईप वळलेल्या अवस्थेत आहेत. आत्महत्या केलेल्यांमध्ये सात महिला आणि चार पुरुषांचा समावेश असल्यानं यावरुन तर्कवितर्क लढवले जात आहेत. अकरा या आकड्याचा योगायोग इथेच संपत नाही. घरात लावण्यात आलेल्या तावदानाला 11 अँगल आहेत. याशिवाय या घरात 11 खिडक्या आहेत. त्यामुळे घरातल्या या 11 फॅक्टरचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.  

टॅग्स :Burari Deathsबुरारी मृत्यूCrimeगुन्हाdelhiदिल्लीSuicideआत्महत्या