बैल वाहून नेणारा टेम्पो अडवून आकाशवाणी चौकात गोंधळ पांझरापोळ संस्थेत नेले बैल : दगडफेकीमुळे तणावाची स्थिती

By Admin | Updated: March 10, 2016 00:26 IST2016-03-10T00:26:15+5:302016-03-10T00:26:15+5:30

जळगाव: गाय समजून बैल वाहून नेणारा टेम्पो अडवून बुधवारी रात्री नऊ वाजता आकाशवाणी चौकात तरुणांनी गोंधळ घातला. यावेळी टेम्पो चालक याला धक्काबुक्कीही करण्यात आली. प्रकरण चिघळण्याच्या आत पोलिसांनी घटनास्थळ गाठून टेम्पो जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला आणला. तेथेही काही वेळ गोंधळ झाला. कागदपत्रांची तपासणी करुन बैल पांझरापोळ संस्थेत नेण्यात आले.

Bulls carrying temporarily carrying temples and snatching at Aakashwani Chowk taken to the Panjrapolpol Institute: Balance of tension | बैल वाहून नेणारा टेम्पो अडवून आकाशवाणी चौकात गोंधळ पांझरापोळ संस्थेत नेले बैल : दगडफेकीमुळे तणावाची स्थिती

बैल वाहून नेणारा टेम्पो अडवून आकाशवाणी चौकात गोंधळ पांझरापोळ संस्थेत नेले बैल : दगडफेकीमुळे तणावाची स्थिती

गाव: गाय समजून बैल वाहून नेणारा टेम्पो अडवून बुधवारी रात्री नऊ वाजता आकाशवाणी चौकात तरुणांनी गोंधळ घातला. यावेळी टेम्पो चालक याला धक्काबुक्कीही करण्यात आली. प्रकरण चिघळण्याच्या आत पोलिसांनी घटनास्थळ गाठून टेम्पो जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला आणला. तेथेही काही वेळ गोंधळ झाला. कागदपत्रांची तपासणी करुन बैल पांझरापोळ संस्थेत नेण्यात आले.
वरखेडी ता.पाचोरा येथे गुरुवारी गुरांचा बाजार भरतो. अडावद येथील पठाण नावाचा व्यापारी टेम्पोमध्ये (क्र.एम.एच.०४ एस.३८४९) पाच बैल घेऊन वरखेडीच्या बाजारात विक्रीसाठी नेत असताना बुधवारी रात्री नऊ वाजता वाहतूक शाखेच्या कर्मचार्‍यांनी टेम्पो अडविला. या टेम्पोत गाय असल्याच्या संशयावरून यावेळी काही तरुणांनी गर्दी केली. वाद निर्माण झाल्याने जिल्हा पेठचे पोलीस निरीक्षक श्याम तरवाडकर, गुन्हे शाखेचे राजू मेढे, अल्ताफ पठाण व छगन तायडे यांनी घटनास्थळ गाठून बैलांसह टेम्पो पोलीस स्टेशनला आणला. तेथे कागदपत्रांची तपासणी केली असता झेरॉक्स सेट होता. त्यामुळे बैलांना पांझरापोळ संस्थेत पाठविण्यात आले. तेथेही काही तरुणांनी दगडफेक केली. मूळ कागदपत्रे आणल्यावर बैल व टेम्पोची सुटका केली जाणार आहे.

Web Title: Bulls carrying temporarily carrying temples and snatching at Aakashwani Chowk taken to the Panjrapolpol Institute: Balance of tension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.