चक्क बैल चढला पाण्याच्या टाकीवर !
By Admin | Updated: July 13, 2016 20:56 IST2016-07-13T20:56:50+5:302016-07-13T20:56:50+5:30
तुम्हाला शोले चित्रपटातील वीरुचा पाण्याच्या टाकीवरील सीन आठवतो का? असाच सीन चक्क एका बैलाने केला आहे. मात्र तो आत्महत्येच्या धमकीसाठी नाही.

चक्क बैल चढला पाण्याच्या टाकीवर !
>ऑनलाइन लोकमत
जयपूर, दि. १३ - तुम्हाला शोले चित्रपटातील वीरुचा पाण्याच्या टाकीवरील सीन आठवतो का? असाच सीन चक्क एका बैलाने केला आहे. मात्र तो आत्महत्येच्या धमकीसाठी नाही.
चुरु जिल्ह्यातील रतनगडमध्ये चक्क एक बैल साठ फूट उंचीच्या टाकीवर चढल्याचे वृत्त आहे. सुरुवातीला यासंदर्भातील बैलाचा फोटो येथील लोकांकडून सोशल मिडीयात व्हायरल झाल्यानंतर अनेकांना हा फोटो मॉर्फ केल्याचे वाटत होते. मात्र काहींनी यासंबंधीत स्थानिक प्रशासनाला मदतीसाठी कळविले असता, त्यांना सुद्दा हसू आले.
त्यानंतर पोलिसांना याबाबत माहिती दिली असता पोलीस घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी बैलाला टाकीवरन खाली आणण्यासाठी अथक प्रयत्न केले. यासाठी मोठी क्रेन मागविली. मात्र पोलिसांचे प्रयत्न बैलाला खाली उतरविण्यास अयशस्वी ठरले. त्यानंतर लष्कराला पाचारण करण्यात आले. लष्कर आल्यानंतरही बराच वेळानंतर बैलाला खाली उतरविण्यास यश आले.