‘बुलेट ट्रेन’ सूट-बूटवाल्यांचीच
By Admin | Updated: June 17, 2015 02:29 IST2015-06-17T02:29:51+5:302015-06-17T02:29:51+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी गरीब आणि आदिवासींकडे दुर्लक्ष करीत आहेत. मोदी सरकार बुलेट ट्रेनच्या बाता करीत आहे

‘बुलेट ट्रेन’ सूट-बूटवाल्यांचीच
जांजगीर (छत्तीसगड) : पंतप्रधान नरेंद्र मोदी गरीब आणि आदिवासींकडे दुर्लक्ष करीत आहेत. मोदी सरकार बुलेट ट्रेनच्या बाता करीत आहे, केवळ सूट-बूटवालेच या रेल्वेत बसून प्रवास करतील. शेतकरी आणि उपेक्षितांना ती सोय नसेल, अशा शब्दांत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी टीकास्त्र सोडले. छत्तीसगड भेटीच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी जांजगीर चांपा ते साराडीह ही १० कि.मी. पदयात्रा काढून शेतकरी आणि आदिवासींशी संवाद साधला.
केंद्र आणि छत्तीसगडमधील सरकार विकासाच्या नावावर जमीन ताब्यात घेत आहे. हा विकास गरीब आणि आदिवासींच्या दारी पोहोचला नाही.
मोदींनी विकासाच्या नावावर मते मिळविण्यासाठीच गरीब आणि आदिवासी भागाला भेटी दिल्या होत्या. मोदी निवडणुका होतील तेव्हाच येथे येतील, त्याआधी नाही, हे मी लिहून देतो. ते येतील तेव्हा म्हणतील ‘हमने अच्छे दिन लाए है’ आता आम्हाला मतदान करा. १५ लाखांचा सूट परिधान करणारे मोदी आॅस्ट्रेलिया आणि अमेरिकेला जाणेच पसंत करतात. ते १५ लाख रुपयांचा सूट उतरवून या गावांना भेटी देतील तेव्हा त्यांना मनरेगाचे दर कळतील, असा टोलाही त्यांनी मारला. (वृत्तसंस्था)