शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ठाण्यात EVM पडले बंद
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
5
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
6
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
7
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
8
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
9
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
10
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
11
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
12
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
13
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
14
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
15
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
16
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
17
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
18
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
19
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
20
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट

बुलेट ट्रेनचे भाडे २५0 ते ३,000 रुपये; ३२० किमी प्रति तास वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 12:57 AM

मुंबई ते अहमदाबाद या प्रस्तावित बुलेट ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी प्रवाशांना अंतरानुसार, किमान २५० रुपये ते कमाल ३,००० रुपये एवढे भाडे द्यावे लागणार आहे. या बुलेट ट्रेनची गती ३२० किमी प्रति तास असणार आहे.

नवी दिल्ली : मुंबई ते अहमदाबाद या प्रस्तावित बुलेट ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी प्रवाशांना अंतरानुसार, किमान २५० रुपये ते कमाल ३,००० रुपये एवढे भाडे द्यावे लागणार आहे. या बुलेट ट्रेनची गती ३२० किमी प्रति तास असणार आहे. ही ट्रेन २०२२ पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. संभाव्य भाडेदराचा अंदाज नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अचल खरे यांनी दिला.अचल खरे यांनी सांगितले की, मुंबई ते अहमदाबाद दरम्यानचे भाडे ३००० रुपये असेल. बिझनेस क्लाससाठी या ट्रेनमध्ये भाडे दर ३,००० रुपयांपेक्षा अधिक असू शकते. बांद्रा- कुर्ला कॉम्प्लेक्स आणि ठाणे भाडे २५० रुपये असेल. या दोन स्टेशनांदरम्यान टॅक्सीचे भाडे ६५० रुपये असून, त्यासाठी वेळ अडीच तास एवढा लागतो. हाय स्पीड ट्रेनने १५ मिनिटांत हे अंतर पार करता येईल.त्यांनी सांगितले की, एसी प्रथम श्रेणीचे भाडे दीडपट अधिक असेल. एका ट्रेनमध्ये १० डबे असतील. यातील एक बिझनेस क्लासचा असेल. या योजनेनुसार, डिसेंबरमध्ये कामाला सुरुवात होईल. कारण तोपर्यंत भूसंपादन होण्याची शक्यता आहे. मंत्रालयाला या योजनेसाठी १,४१५ हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे. यासाठी १० हजार कोटी रुपये मंजूर झाले आहेत. महाराष्ट्र सरकारने भूसंपादनासाठी अधिसूचना काढली आहे. बाजारभावापेक्षा या जमिनींना २५ टक्के जादा दर दिला जाईल.४,००० जणांना मिळेल थेट रोजगारअधिकाऱ्यांनी सांगितले की, या प्रकल्पांतर्गत ३ ते ४ हजार लोकांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे, तर ३० ते ४० हजार कामगारांच्या हाताला काम मिळणार आहे. या योजनेत जपानची अधिक भागीदारी असल्याचे वृत्त फेटाळून लावताना अधिकाºयांनी सांगितले की, त्यांची भागीदारी फक्त १८.६ टक्के आहे. भारतीय कंत्राटदार ४६० किमीचे काम करणार आहेत. जपान समुद्राखालील २१ किमीचे काम करणार आहे.अपघातांचा नीचांकरेल्वेसाठी २०१७-१८ हे वर्ष मागील ५७ वर्षांतील सर्वाधिक सुरक्षित वर्ष ठरले आहे. गेल्या वर्षभरात ७३ रेल्वे अपघात झाले. हा अपघातांचा गेल्या ५७ वर्षांतील नीचांक ठरला आहे.त्या आधीच्या वर्षी १०४ रेल्वे अपघात झाले होेते. २०१७-१८ मध्ये रेल्वेने ४,४०५ किमीच्या रेल्वे मार्गांचे नूतनीकरण केले. हा उच्चांक ठरला आहे. सर्व रेल्वेगाड्यांनी मिळून २०१७-१८ मध्ये १,१७०.७ दशलक्ष ट्रेन कि.मी. प्रवास केला आहे.रेल्वेच्या इतिहासातील हा सर्वाधिक लांब प्रवास आहे. एवढा विक्रमी प्रवास करूनही अपघातांत घसरण झाली आहे.

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेन