राजस्थानातील बुलेट बाबा!

By Admin | Updated: January 16, 2017 05:08 IST2017-01-16T05:08:13+5:302017-01-16T05:08:13+5:30

भारतातील बाइकप्रेमींची पसंत असलेल्या बुलेट मोटारसायकलचे एक मंदिर राजस्थानात आहे.

Bullet Baba in Rajasthan! | राजस्थानातील बुलेट बाबा!

राजस्थानातील बुलेट बाबा!


राजस्थान- भारतातील बाइकप्रेमींची पसंत असलेल्या बुलेट मोटारसायकलचे एक मंदिर राजस्थानात आहे. गंमत म्हणजे मोटारसायकल म्हटल्यानंतर पेट्रोलचा नैवेद्य येथे वाहिला जात असेल, असा जर कोणाचा अंदाज असेल, तर तो बिलकूल खोटा आहे.
या मंदिरात चक्क दारूचा नैवेद्य दाखविला जातो. जोधपूरपासून ५0 किमी अंतरावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५0 वर हे मंदिर असून, या मार्गावरून प्रवास करणारे प्रवासी येथे हमखास थांबून दर्शन घेतात. दिवसाच्या कोणत्याही वेळी गेलात तरी या ठिकाणी पाली-जोधपूर महामार्गावरील या ठिकाणी गर्दीमुळे वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून येते. बुलेट बाबा अपघातापासून संरक्षण करतात, असा लोकांचा समज आहे. इतर मंदिरांप्रमाणे या मंदिरातही सकाळी व संध्याकाळी आरती होते.

Web Title: Bullet Baba in Rajasthan!