शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 17:50 IST

Rajasthan News: एका पाण्याच्या टाकीवर चक्क बैल चढल्याने एकच गोंधळ उडाला. हा प्रकार पाहण्यासाठी पाण्याच्या टाकीजवळ बघ्यांची भरपूर गर्दी जमली. अखेरीस सहा तासांनंतर या बैलाला खाली उतरवण्यात यश आले.

शोले या चित्रपटात वीरूचं पात्र साकारणाऱ्या धर्मेंद्रने पाण्याच्या टाकीवर चढून घातलेल्या गोंधळाचा सिन सुपरहिट झाला होता. आता पाण्याच्या टाकीवर चढून अनेक आंदोलनं होतात, तसेच काही जण विनाकारण लक्ष वेधून घेत असतात. मात्र राजस्थानमधील श्रीगंगानगर जिल्ह्यातील नेतेवाला येथे एका पाण्याच्या टाकीवर चक्क बैल चढल्याने एकच गोंधळ उडाला. हा प्रकार पाहण्यासाठी पाण्याच्या टाकीजवळ बघ्यांची भरपूर गर्दी जमली. शेवटी याची माहिती प्रशासनाला देण्यात आली.

काही वेळातच पोलिसांसह एसडीएम रणजीत, तहसीलदार विक्रम हे घटनास्थळी दाखल झाले. पाण्याच्या टाकीवर चढलेल्या बैलाला खाली उतरवण्यासाठी एक हायड्रो पोकलेन मशीन बोलावण्यात आली. या मशीनच्या मदतीने या बैलाला खाली उतरण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. अखेरीस सहा तासांनंतर या बैलाला खाली उतरवण्यात यश आले.

हा बैल पाण्याच्या टाकीवर खूप उंचावर पोहोचल्याने त्याला उतरवण्यासाठी खूप काळजी घ्यावी लागली. कारण हा बैल बिथरून उधळला असता तर खाली पडून त्याचा मृत्यू होण्याची शक्यता होती.  त्यामुळे आधी एका प्राण्यांच्या डॉक्टराला बोलावून बैलाला बेशुद्ध पडण्याचं इंजेक्शन देण्यात आले. मग पाण्याच्या टाकीवर जाऊन आधी या बैलाला दोरीने बांधण्यात आले. त्यानंतर मशिनीच्या मदतीने त्याला हळुहळू खाली उतरवण्यात आले. त्यानंतर प्रशासनाने सुटकेचा निश्वास टाकला.

दरम्यान, श्रीगंगानगरमध्ये याआधीही अशी घटना घडली होती. त्यावेळीही एक बैल पाण्याच्या टाकीवर चढला होता. तेव्हा हीच क्लुप्ती वापरून त्याला खाली उतरवण्यात आले होते.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेRajasthanराजस्थानSocial Viralसोशल व्हायरल