उत्तर प्रदेशच्या धर्तीवर बसपाची संघटन बांधणी
By Admin | Updated: July 7, 2015 01:06 IST2015-07-07T01:06:06+5:302015-07-07T01:06:06+5:30
उत्तर प्रदेशच्या धर्तीवर बसपाची संघटन बांधणी

उत्तर प्रदेशच्या धर्तीवर बसपाची संघटन बांधणी
उ ्तर प्रदेशच्या धर्तीवर बसपाची संघटन बांधणी पूर्व विदर्भ पदाधिकाऱ्यांची बैठक : विलास गरुड-वीरसिंह यांचे दिशानिर्देश नागपूर : महाराष्ट्र आणि विशेषत: विदर्भात बसपा नव्याने संघटन बांधणीवर भर देत आहे. बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांनी महाराष्ट्रातही संघटनेची बांधणी उत्तर प्रदेशच्या धर्तीवर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार सोमवारी बसपाच्या पूर्व विदर्भातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह उरुवेला कॉलनी येथे पार पडली. या बैठकीत बसपाचे प्रदेशाध्यक्ष विलास गरुड आणि महाराष्ट्राचे प्रभारी खा. वीरसिंह यांनी पदाधिकाऱ्यांना विशेष दिशानिर्देश दिले. विलास गरुड यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, उत्तर प्रदेशच्या धर्तीवर वॉर्ड, सेक्टर, बूथ आणि पोलिंग कमिटी स्थापन करण्यात यावी. येत्या तीन महिन्यामध्ये हे काम पूर्ण करण्यात यावे. शाहू- फुले-आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणाऱ्या बसपाचे संघटन महत्त्वाचे आहे. त्यामुळे संघटनेला कमकुवत करणाऱ्या लोकांना पक्षात कदापि खपवून घेतले जाणार नाही. जे लोक पक्षातून काढण्यात आले ते दुष्प्रचार करीत आहेत. त्याकडे कुणीही लक्ष देऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. खा. वीरसिंह यांनी काँग्रेस-भाजपावर प्रहार करीत बसपा उत्तर प्रदेशात पुन्हा सत्ता स्थापन करेल, असा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी चंद्रपूर जिल्ह्यातील कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली. बैठकीला बसपाचे प्रदेश उपाध्यक्ष कृष्णा बेले, जिल्हाध्यक्ष नागोराव जयकर, प्रदेश मीडिया प्रभारी सागर डबरासे, प्रेम रोडेकर, विश्वास राऊत, उत्तम शेवडे, संदीप ताजने, विवेक हाडके, पृथ्वीराज शेंडे, मिलिंद बन्सोड आदी उपस्थित होते. जितेंद्र म्हैसकर यांनी संचालन केले. राजकुमार बोरकर यांनी आभार मानले.