आंतरराष्ट्रीय सीमेवरील सुरक्षा वाढविली
By Admin | Updated: January 20, 2015 01:30 IST2015-01-20T01:30:41+5:302015-01-20T01:30:41+5:30
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत दौऱ्याच्या दृष्टिकोनातून सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) जम्मू आणि काश्मीरच्या आंतरराष्ट्रीय सीमेवरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली

आंतरराष्ट्रीय सीमेवरील सुरक्षा वाढविली
नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत दौऱ्याच्या दृष्टिकोनातून सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) जम्मू आणि काश्मीरच्या आंतरराष्ट्रीय सीमेवरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली असून, १२०० अतिरिक्त जवान तैनात केले आहेत.
राज्यात आंतरराष्ट्रीय सीमेजवळच्या भागात घुसखोरीचे प्रयत्न वाढले आहेत. गुप्तचर यंत्रणांकडून प्राप्त माहितीनुसार, पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा हल्ल्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे सीमेवर बीएसएफच्या १० ते १२ अतिरिक्त कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. या प्रत्येक कंपनीत १०० जवान आहेत. सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न दररोजच होत आहे. दाट धुके व कडाक्याच्या थंडीमुळे घुसखोरी रोखणे हे लष्करासाठी मोठे आव्हान ठरले आहे. (वृत्तसंस्था)