शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणप्रेमी गाड्या बनवा अन्यथा मी बुलडोझर फिरवीन - नितिन गडकरींची कार उत्पादकांना धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2017 18:31 IST

पर्यावरणप्रेमी असलेल्या पर्यायी ऊर्जेवर चालणाऱ्या गाड्या बनवा अन्यथा, कारखान्यावर बुलडोझर चालवला जाईल त्यास तयार रहा असा कडक इशारा रस्ते व महामार्गाचे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी कार उत्पादकांना दिला आहे

ठळक मुद्देतुम्हाला आवडो अथवा न आवडो पर्यायी ऊर्जेवर चालणाऱ्या वाहनांकडे वळावेच लागेलआयात कमी करणं आणि प्रदूषण नियंत्रणात ठेवणं हे सरकारचे स्पष्ट धोरणजे सरकारला मदत करतील त्यांना फायदा होईल आणि जे कुणी निव्वळ पैसा कमवतील त्यांना त्रास होईल

नवी दिल्ली, दि. 7 - पर्यावरणप्रेमी असलेल्या पर्यायी ऊर्जेवर चालणाऱ्या गाड्या बनवा अन्यथा, कारखान्यावर बुलडोझर चालवला जाईल त्यास तयार रहा असा कडक इशारा रस्ते व महामार्गाचे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी कार उत्पादकांना दिला आहे. वीजेवर चालणाऱ्या गाड्यांसदर्भात मंत्रिमंडळाचा अहवाल तयार असून त्यामध्ये वाहनं चार्ज करणाऱ्या स्टेशन्सचा विचार करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

तुम्हाला आवडो अथवा न आवडो पर्यायी ऊर्जेवर चालणाऱ्या वाहनांकडे वळावेच लागेल असेही त्यांनी सांगितले. आणि मी तुम्हाला विचारत नाहीये तर सांगतोय की प्रदूषण करणाऱ्या पारंपरिक उर्जास्त्रोतांवर चालणाऱ्या गाड्याच बनवाल तर मी बुलडोझर फिरवीन असे गडकरी म्हणाले. आयात कमी करणं आणि प्रदूषण नियंत्रणात ठेवणं हे सरकारचे स्पष्ट धोरण असल्याचे गडकरी यांनी सिअॅम या कार उत्पादक संघटनेच्या वार्षिक कार्यक्रमात ते बोलत होते.

जे सरकारला मदत करतील त्यांना निश्चित फायदा होईल आणि जे कुणी निव्वळ पैसा कमवायचा विचार करतील त्यांना त्रास होईल असा इशाराही त्यांनी दिला. पर्यायी ऊर्जेवर चालू न शकणारी प्रचंड वाहने ताफ्यात पडून आहेत अशी तक्रार मागाहून करू नका असे गडकरी म्हणाले. इलेक्ट्रिक वेहिकल्सवर लवकरच सरकार धोरण आखणार असून सध्या या विषयावरील चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी सूचित केले.

भविष्य पेट्रोल व डिझेलच्या गाड्यांचे नसून पर्यायी ऊर्जेचे असल्याचे त्यांनी सांगितले. मी आधी तुम्हाला नम्रपणे संशोधन करण्यास सांगितले. प्रथम ज्यावेळी मी बोललो, त्यावेळी तुम्ही म्हणालात बॅटरी खूप महाग पडते. आता बॅटरीची किंमत 40 टक्क्यांनी घसरली आहे. आणि तुम्ही आता उत्पादनाच्या दृष्टीने सुरूवाती कराल तर या किमती आणखी कमी होतील, असे ते म्हणाले. कार, बसेस, टॅक्सी अथवा मोटरसायकल काही असो भविष्य हे वीजेवर चालणाऱ्या गाड्यांमध्ये असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

पेट्रोल - डिझेलच्या गाड्यांमुळे प्रदूषण वाढते हे सांगतानाच भारताची आयात दरवर्षी सात लाख कोटी रुपयांची असल्याचे सांगत हे दुहेरी नुकसान असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. 

टॅग्स :Nitin Gadakriनितिन गडकरीAutomobileवाहन