शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Budget 2018 : सर्वसामान्यांचं स्वप्न पूर्ण करणारा अर्थसंकल्प - नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2018 10:48 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांचं स्वप्न पूर्ण करणारा असेल असं म्हटलं आहे

नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आज संसदेत अर्थसंकल्प मांडणार आहेत. सलग पाचव्यांदा ते अर्थसंकल्प मांडत आहेत.  केवळ देशच नाही तर संपूर्ण जगाचं लक्ष अरुण जेटली यांच्यावर आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांचं स्वप्न पूर्ण करणारा असेल असं म्हटलं आहे. याआधी अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांनीदेखील हा अर्थसंकल्पन सर्वसामान्यांसाठी असेल असं म्हटलं होतं. 

दरम्यान केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली संसदेत पोहोचले असून कॅबिनेट बैठकीला सुरुवात झाली आहे. बैठकीत अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली. संसदेत पोहोचण्याआधी अरुण जेटली राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भेटीला पोहोचले होते. अरुण जेटल अर्थसंकल्पात कोणकोणत्या घोषणा ते करणार आहेत, यावर सर्वांची नजर आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पाबद्दल उत्सुकता आहे.  आज सकाळी 11 वाजता प्रतीक्षित असा केंद्रीय अर्थसंकल्प अरूण जेटली सादर करणार असून जेटली हे हिंदीमधून सादर करणार आहेत. हिंदीमधून बजेट सादर करणारे अरूण जेटली हे भारताचे पहिले अर्थमंत्री ठरणार आहेत. आत्तापर्यंत सादर झालेले सगळे केंद्रीय अर्थसंकल्प इंग्रजीतून मांडण्यात आले होते. देशभरातील बहुसंख्य राज्यांमधील ग्रामीण भागातील जनतेशी थेट संवाद व्हावा यासाठी जेटली हिंदीतून बोलणार असल्याची चर्चा आहे.

 

आगामी काही दिवसांमध्ये आठ राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. तसेच वर्षभरानं लोकसभेच्या निवडणुका आहेत, त्यामुळे संपूर्ण असं हे शेवटचं बजेट असेल. त्यामुळेच हे बजेट ग्रामीण भारतासाठी असेल असं बोललं जातंय. त्यामुळेच ग्रामीण भारताला ते नीट समजावं, त्यांच्या अर्थमंत्र्यांचा थेट संवाद व्हावा यासाठी अर्थसंकल्प हिंदीतून मांडण्यात येईल आणि आत्तापर्यंतचा इंग्रजीतून बजेट मांडण्याचा पायंडा जेटली मोडतील असं मानलं जात आहे.  

टॅग्स :Budget 2018अर्थसंकल्प २०१८Narendra Modiनरेंद्र मोदी