७ जुलैपासून सुरू होणार संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन
By Admin | Updated: June 23, 2014 13:44 IST2014-06-23T13:44:26+5:302014-06-23T13:44:47+5:30
येत्या ७ जुलैपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे.

७ जुलैपासून सुरू होणार संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन
>ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. २३ - येत्या ७ जुलैपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. ७ जुलै ते १४ ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. या अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचा पहिला अर्थसंकल्प मांडला जाणार आहे.
संसदेमध्ये ८ जुलै रोजी रेल्वे अर्थसंकल्प सादर करण्यात येणार असून ९ जुलैला आर्थिक सर्वेक्षण मांडण्यात येणार आहे. तर केंद्रीय अर्थसंकल्प १० तारखेला मांडण्यात येईल. याआधीच्या लोकसभेत मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पाची मुदत ३१ जुलैपर्यंत असून त्याआधी नवा अर्थसंकल्प मांडणे आवश्यक आहे.