अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरणार

By Admin | Updated: February 22, 2015 00:10 IST2015-02-22T00:10:27+5:302015-02-22T00:10:27+5:30

उद्या सोमवारपासून सुरू होत असलेले संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हे आहेत.

Budget session will be stormy | अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरणार

अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरणार

नवी दिल्ली : उद्या सोमवारपासून सुरू होत असलेले संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हे आहेत. या अधिवेशनात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला राज्यसभेत वटहुकमांच्या जागी सहा विधेयके मंजूर करून घेण्यास तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या दारुण पराभवानंतर अनेक विरोधी पक्षांनी केंद्राच्या ‘अध्यादेश राज’विरुद्ध मोहीमच उघडली आहे आणि प्रामुख्याने भूसंपादन कायद्यातील दुरुस्तीविरुद्ध विरोधकांनी कठोर पवित्रा घेतला आहे. तीन महिने चालणाऱ्या या संसद अधिवेशनात सरकार अर्थसंकल्पही सादर करेल.
गेल्या काही महिन्यांपासून काही भाजपा नेते आणि संघ परिवारातील सदस्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे विरोधकांना आयतेच कोलित सापडले आहे. याशिवाय चलन फुगवट्यासह अनेक मुद्दे त्यांच्याकडे आहेत.
विरोधकांसोबत सामंजस्याचा प्रयत्न
दरम्यान, अधिवेशनाचे कामकाज सुरळीत पार पडावे, यासाठी सरकारने विविध माध्यमांनी विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांसोबत चर्चा केली आहे. परंतु विरोधकांकडून कुठलाही दिलासा मिळण्याचे चिन्ह नाही.

Web Title: Budget session will be stormy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.