शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी सरकारचे मोठे पाऊल; सर्व निलंबित खासदारांचे निलंबन मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2024 16:44 IST

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी सर्व निलंबित विरोधी खासदारांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे.

Budget 2024: उद्या(दि. 31 जानेवारी) पासून संसदेचेअर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनापूर्वी, हिवाळी अधिवेशनादरम्यान निलंबन करण्यात आलेल्या सर्व विरोधी खासदारांचे निलंबन मागे घेण्यात येणार आहे. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती दिली.

प्रल्हाद जोशी म्हणाले, 'सर्व खासदारांचे निलंबन रद्द केले जाईल. मी लोकसभा आणि राज्यसभा सभापतींशी याबाबत चर्चा केली आहे. हे सभापतींच्या अधिकारक्षेत्रात आहे, त्यामुळे आम्ही संबंधित विशेषाधिकार समित्यांशी बोलून निलंबन रद्द करण्याबाबत विनंती केली आहे. यावर दोन्ही सभापतींचे एकमत झाले आहे. निलंबित खासदार उद्यापासून सभागृहात येऊ शकतात.

अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक लोकसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी, म्हणजेच 31 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने मंगळवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. संरक्षण मंत्री आणि लोकसभेतील सभागृहाचे उपनेते राजनाथ सिंह, संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी बैठकीत सरकारचे प्रतिनिधित्व केले.

या बैठकीत काँग्रेस नेते कोडिकुनिल सुरेश, तृणमूल काँग्रेसचे सुदीप बंदोपाध्याय, द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) नेते टीआर बालू, शिवसेनेचे राहुल शेवाळे, समाजवादी पक्षाचे नेते एसटी हसन, जनता दल (युनायटेड) नेते एस.टी. रामनाथ ठाकूर आणि तेलुगु देसम पार्टी (टीडीपी) जयदेव गल्ला यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. 

टॅग्स :ParliamentसंसदBudget Sessionअर्थसंकल्पीय अधिवेशनUnion Budgetकेंद्रीय अर्थसंकल्प 2019delhiदिल्लीcongressकाँग्रेसINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी