बजेट : इलेक्ट्रॉनिक्स, आयटी विभागाच्या योजना खर्चात कपातीची शक्यता
By Admin | Updated: February 21, 2015 00:49 IST2015-02-21T00:49:57+5:302015-02-21T00:49:57+5:30
नवी दिल्ली : केंद्र सरकार आपल्या आगामी २०१५-१६ च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी विभागाच्या योजना खर्चात कपात करण्याची शक्यता आहे. हा खर्च २५०० कोटी रुपये करण्यात येईल, असा अंदाज आहे. मागील अर्थसंकल्पात इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी विभागाचा योजना खर्च ३८१५ कोटी रुपये होता.

बजेट : इलेक्ट्रॉनिक्स, आयटी विभागाच्या योजना खर्चात कपातीची शक्यता
न ी दिल्ली : केंद्र सरकार आपल्या आगामी २०१५-१६ च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी विभागाच्या योजना खर्चात कपात करण्याची शक्यता आहे. हा खर्च २५०० कोटी रुपये करण्यात येईल, असा अंदाज आहे. मागील अर्थसंकल्पात इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी विभागाचा योजना खर्च ३८१५ कोटी रुपये होता.इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी विभागाचा योजना खर्च यावेळी २५०० कोटी रुपये राहू शकतो, असे सूत्रांनी सांगितले. हा विभाग देशात इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणे, ते कार्यान्वित करणे आणि त्याची समीक्षा करण्यासाठी जबाबदार आहे. सोबतच डिजीटल इंडियासाठीही हा विभाग निगराणी संस्था म्हणून काम पाहात आहे. (वृत्तसंस्था)