अर्थसंकल्प 10 जुलैला

By Admin | Updated: June 24, 2014 02:33 IST2014-06-24T02:33:52+5:302014-06-24T02:33:52+5:30

नरेंद्र मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प 1क् जुलै रोजी संसदेत सादर केला जाणार आहे.

Budget to July 10 | अर्थसंकल्प 10 जुलैला

अर्थसंकल्प 10 जुलैला

>नवी दिल्ली : नरेंद्र मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प 1क् जुलै रोजी संसदेत सादर केला जाणार आहे. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 7 जुलैपासून सुरू होणार असून, ते 14 ऑगस्टर्पयत चालणार आहे. रेल्वे अर्थसंकल्प 8 जुलैला मांडण्यात येणार आहे, तर आर्थिक सव्रेक्षण 9 जुलैला प्रसिद्ध करण्यात येईल. संसदीय कामकाजमंत्री एम. वेंकय्या नायडू यांच्या कार्यालयात संसदीय कामकाजासंदर्भातील मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तारखांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. या अधिवेशनामध्ये एससी/एसटी प्रिव्हेन्शन ऑफ अॅट्रॉसिटीज (अमेंडमेंट) ऑर्डिनन्स, पोलावरम प्रकल्प, ट्राय अॅक्ट (अमेंडमेंट) ऑर्डिनन्स व सेबीवरील वटहुकूम विधेयकात रूपांतरित करण्यास सरकारचे प्राधान्य राहणार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Budget to July 10

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.