शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

Budget 2025: अर्थसंकल्पात 'GYAN' वर फोकस, शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री धनधान्य योजनेची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 11:42 IST

कृषी क्षेत्रात गुंतवणूक वाढवून शेतकऱ्यांचं सरासरी उत्पन्न वाढवण्यावर लक्ष दिले जाईल असंही निर्मला सीतारामन यांनी सांगितले.

नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात GYAN म्हणजेच गरीब, युवा, अन्नदाता आणि नारी शक्ती यावर सरकारने फोकस दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आम्ही अर्थव्यवस्थेला गती दिली आहे असं सांगत केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी 'प्रधानमंत्री धनधान्य योजना'घोषित केली. त्याशिवाय किसान क्रेडिट कार्डची मर्यादा ५ लाखापर्यंत वाढवण्यात आल्याचं अर्थमंत्र्‍यांनी सांगितले.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, देशातील शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री धनधान्य योजना लागू करणार आहोत. राज्य सरकारसोबत मिळून केंद्र ही योजना राबवेल. या योजनेचा १.७ कोटी शेतकऱ्यांना फायदा मिळणार आहे. फार्म ग्रोथ, ग्रामीण विकास, उत्पादन यावर आम्ही भर देत आहोत. देशातील १०० जिल्ह्यात धनधान्य योजना सुरू करणार आहोत. त्याशिवाय बिहारच्या लोकांचं उत्पन्न वाढवण्यासाठी मखाना बोर्डाची स्थापना केली जाईल. दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या कर्जाची मर्यादा ३ लाखाहून ५ लाख इतकी करण्यात येईल असं त्यांनी सांगितले. 

तसेच फळ, भाज्या उत्पादन वाढीवर भर दिला जाणार आहे. राज्यांसोबत मिळून केंद्र सरकार धनधान्य योजना राबवू. आसाममध्ये नवीन यूरिया प्लॅंट उघडला जाईल. कृषी विकासावर भर देत ज्या जिल्ह्यात कमी उत्पादन असेल अशा १०० जिल्ह्यांवर पहिल्या टप्प्यात फोकस ठेवला जाईल. कृषी उत्पादन वाढवणे, सिंचन वाढीवर भर दिला जाईल, ग्रामीण भागात विकास, कृषी क्षेत्रात गुंतवणूक वाढवून शेतकऱ्यांचं सरासरी उत्पन्न वाढवण्यावर लक्ष दिले जाईल असंही निर्मला सीतारामन यांनी सांगितले. 

दरम्यान, पुढील ६ वर्ष मसूर, तूरसारख्या डाळींच्या उत्पादन वाढीवर लक्ष दिले जाईल. कापूस उत्पादन वाढवण्याचं पुढील ५ वर्षाचं मिशन असेल. त्यातून देशातील कापड उद्योग मजबूत होईल. भारतात फुटवेअर आणि लेदर क्षेत्राच्या मदतीसोबतच विना लेदरच्या फुटवेअरची योजना आणली जाईल. त्यातून २२ लाख रोजगार आणि ४ लाख कोटी व्यवसाय उबा राहिल. १.१ लाख कोटीहून अधिक यातून निर्यात केली जाईल. तसेच MSME सेक्टरचा विकास केला जाईल. सध्या १ कोटीहून अधिक MSME नोंदणी आहेत. त्यातून कोट्यवधी रोजगार निर्माण झालेत. भारत उत्पादन क्षेत्राचं हब बनतंय. आम्ही MSME सुक्ष्म उद्योजकांसाठी क्रेडिट गॅरंटी ५ कोटीवरून १० कोटीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतल्याचं अर्थमंत्र्‍यांनी सांगितले. 

टॅग्स :Budget 2025अर्थसंकल्प २०२५FarmerशेतकरीNirmala Sitaramanनिर्मला सीतारामन