शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

अवघ्या 10 दिवसांतच दुसरा दिल्ली दौरा; चंद्राबाबू नायडूंच्या केंद्रासमोर 'या' तीन मागण्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2024 15:00 IST

Budget 2024 : येत्या 23 जुलै रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन मोदी 3.0 चा पहिला अर्थसंकल्प सादर करतील.

Budget 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वातील NDA सरकारचा (Modi 3.0) पहिला अर्थसंकल्प (Budget 2024) येत्या 23 जुलै रोजी सादर होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत हा अर्थसंकल्प सादर करतील. दरम्यान, एनडीए सरकारमध्ये किंगमेकर म्हणून उदयास आलेल्या तेलगू देसम पार्टीला (TDP) या अर्थसंकल्पातून राज्यासाठी मोठ्या अपेक्षा आहेत. याच पार्श्वभूमीवर TDP प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांचे दिल्ली दौरे वाढले आहेत. 

चंद्राबाबूंनी घेतली अमित शाह यांची भेट आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आपल्या तीन इच्छा सरकारकडे बोलून दाखवल्या आहेत. विशेष म्हणजे, टीडीपी प्रमुख आपल्या इच्छा पूर्ण करुन घेण्यासाठी सातत्याने दिल्ली दौरे करत असून, भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेत आहेत. मंगळवारी(दि.16) त्यांनी अवघ्या 10 दिवसांतच दुसऱ्यांदा दिल्ली गाठून गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. आपल्या तीन इच्छा पूर्ण करुन घेण्यासाठी टीडीपी आग्रही आहे. 

चंद्राबाबूंच्या त्या 3 प्रमुख मागण्या कोणत्या?मीडिया रिपोर्ट्सनुसार, चंद्राबाबूंची पहिली इच्छा म्हणजे, अनंतपूर, चित्तूर, कडप्पा, कुरनूल, श्रीकाकुलम, विशाखापट्टणम आणि विजयनगरमसह राज्यातील इतर मागासलेल्या जिल्ह्यांसाठी अर्थसंकल्पीय अनुदान असावे. दुसरी इच्छा म्हणजे, अमरावतीसाठी आर्थिक मदत आणि तिसरी इच्छा, पोलावरम पाटबंधारे प्रकल्पासाठी वेळेत पैसे मिळावेत. दरम्यान, चंद्राबाबू नायडू आपल्या या तीन मागण्या मान्य करुन घेण्याचा प्रयत्न करत आहेत, पण सध्या त्यांनी आंध्र प्रदेशसाठी विशेष दर्जा मिळविण्याची मागणी बाजुला ठेवली आहे.

अर्थमंत्री इतिहास रचणार 23 जुलै 2024 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थमंत्र्यांचे अर्थसंकल्पीय भाषण सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होईल. देशाच्या अर्थमंत्री म्हणून सीतारामन यांचा हा सलग सातवा अर्थसंकल्प असेल. हा सादर करण्यासोबतच त्या नवा इतिहासही रचतील या अर्थसंकल्पासह सीतारामन, माजी अर्थमंत्री मोरारजी देसाई यांचा विक्रम मोडतील. त्यांनी सलग सहा वेळा अर्थसंकल्प सादर केला होता. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीChandrababu Naiduचंद्राबाबू नायडूAndhra Pradeshआंध्र प्रदेशUnion Budgetकेंद्रीय अर्थसंकल्प 2019Central Governmentकेंद्र सरकार