शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

Budget 2023: आरोग्याची हेळसांड, अर्थसंकल्पातून मोठा डोस हवा होता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 08:57 IST

Budget 2023: अर्थसंकल्पात आरोग्यक्षेत्राकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. गेल्या वर्षी ४३ हजार कोटींच्या मुळातच कमी पडत असणाऱ्या तरतुदीमध्ये वाढ केलेली नाही.

- डॉ.अविनाश भोंडवे(माजी अध्यक्ष, आयएमए महाराष्ट्र)  

अर्थसंकल्पात आरोग्यक्षेत्राकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. गेल्या वर्षी ४३ हजार कोटींच्या मुळातच कमी पडत असणाऱ्या तरतुदीमध्ये वाढ केलेली नाही. जीडीपीच्या १ ते १.२५ टक्के असलेल्या तरतुदींत, कोरोना काळात अपुऱ्या पडलेल्या निधीत किमान जीडीपीच्या २.५ टक्क्यांपर्यंत वाढ अपेक्षित होती, पण याही वर्षी त्याबाबत तोंडाला पाने पुसली आहेत.गेल्या ३-४ अर्थसंकल्पात एम्सच्या धर्तीवर विविध राज्यांत उच्च प्रतीची पूर्ण सुसज्ज अशी रुग्णालये प्रत्येक वेळेस जाहीर केली होती. या वर्षी अशी घोषणा नाही. आयुष्मान भारत या गरिबांसाठी असलेल्या वैद्यकीयसेवेच्या सरकारी योजनेमध्ये काही व्याप्ती, वाढ किंवा बदल नाही. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गाला वैद्यकीय सेवांसाठी खासगी हॉस्पिटलमध्ये शुल्क भरूनच उपचार घ्यावे लागणार आहेत.२०१४ सालापासून नव्याने स्थापन झालेल्या १५७ वैद्यकीय महाविद्यालयांना जोडून १५७ नर्सिंग कॉलेजेस काढली जाणार आहेत, ही समाधानाची गोष्ट आहे. यामुळे भारतातील खासगी आणि सरकारी रुग्णालयातील नर्सेसच्या कमतरतेत घट होईल, हे नक्की. यासोबत औषधनिर्मिती आणि अन्य वैद्यकीय सेवांसाठी लागणाऱ्या कौशल्यपूर्ण सेवांसाठी सरकारी पातळीवर कोर्सेस सुरू होतील.‘सिकल सेल ॲनिमिया’ या दुर्धर आजाराला २०४७ पर्यंत नष्ट करण्याची योजना जाहीर केली आहे. ही किंवा अशीच योजना क्षयरोगासाठी लागू होणे गरजेचे होते.भारताच्या औषध आणि लस निर्माण कंपन्यांना उत्तेजन दिल्याने परकीय चलन वाढू शकते. त्याकडे दुर्लक्ष केले आहे. भारताच्या वैद्यकीय क्षेत्रात जी आधुनिक उपकरणे, यंत्रे आणि इतर सामग्री वापरली जाते, त्यातील ८० टक्के उपकरणे आयात केली जातात. ती भारतात तयार होण्यासंबंधी काही तरतूद केली असती, तर परकीय चलन वाचू शकते.

 

टॅग्स :Budgetअर्थसंकल्प 2023Healthआरोग्य