शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

आजच्या बजेटचा भाजपला निवडणुकीत फायदा होणार की नुकसान? सर्व्हेच्या निष्कर्षानं केलं अवाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 20:38 IST

अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्यावर सत्ताधारी आणि विरोधकांकडून विविध स्वरुपाच्या प्रतिक्रिया येत आहेत. मात्र निवडणुकीच्या रणधुमाळीत सादर झालेल्या या अर्थसंकल्पाचा भाजपला फायदा होणार का? असा प्रश्न प्रत्येकालाच पडला आहे.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंडसह पाच राज्यांतील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्र्यांनी या अर्थसंकल्पाला अमृत काळातील पुढील 25 वर्षांची ब्लू प्रिंट असल्याचे म्हटले आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्यावर सत्ताधारी आणि विरोधकांकडून विविध स्वरुपाच्या प्रतिक्रिया येत आहेत. मात्र निवडणुकीच्या रणधुमाळीत सादर झालेल्या या अर्थसंकल्पाचा भाजपला फायदा होणार का? असा प्रश्न प्रत्येकालाच पडला आहे.

एबीपी न्यूज सी व्होटरने हा सर्व्हे केला आहे. या माध्यमाने निवडणूक होणाऱ्या राज्यांतील जनतेच्या मनाचा कौल जाणण्याचा प्रयत्न केला जात आहे. या सर्वेक्षणात, आजच्या अर्थसंकल्पाचा भाजपला फायदा होणार का? असा प्रश्न लोकांना विचारण्यात आला. 

या प्रश्नावर उत्तर देताना 45 टक्के लोकांनी 'होय' या अर्थसंकल्पाचा भाजपला फायदा होईल, असे म्हटले आहे. तर 39 टक्के लोकांनी 'नाही' या अर्थसंकल्पाचा भाजपला फायदा होणार नाही, असे म्हटले आहे. तसेच, 16 टक्के लोकांनी माहीत नाही अथवा सांगता येत नाही, असे उत्तर दिले आहे.

आजच्या अर्थसंकल्पाचा भाजपला फायदा होणार?हो - 45नाही - 39माहीत नाही - 16

अर्थसंकल्पासंदर्भात काय म्हणतायत सत्ताधारी अणी विरोधक -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पासंदर्भात प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, या अर्थसंकल्पाचा महत्त्वाचा पैलू म्हणजे, गरिबांचे कल्याण आहे. प्रत्येक गरीबाला पक्के घर असावे, नळाला पाणी, शौचालय, गॅसची सुविधा या सर्व गोष्टींवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. याच बरोबर आधुनिक इंटरनेट कनेक्टिव्हिटीवरही तेवढाच भर देण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी यांनी हा अर्थसंकल्प पीपल फ्रेंडली आणि प्रोग्रेसिव्ह असल्याचे म्हटले आहे.

अर्थसंकल्पासंदर्भात राहुल गांधी म्हणाले, 2022-23 च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात पगारदार वर्ग, मध्यमवर्गीय, गरीब, शेतकरी, तरुण आणि छोट्या व्यापाऱ्यांसाठी काहीही नाही. राहूल गांधी यांनी ट्विट केले की, 'मोदी सरकारच्या बजेटमध्ये काहीही नाही. मध्यमवर्गीय, पगारदार वर्ग, गरीब आणि वंचित वर्ग, तरुण, शेतकरी आणि एमएसएमईसाठी काहीही नाही.'

टॅग्स :Union Budgetकेंद्रीय अर्थसंकल्प 2019Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाElectionनिवडणूक