शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Budget 2021: ...अन् निर्मला सीतारामन म्हणाल्या, "चर्चा हाच मार्ग, कृषीमंत्री तयार आहेत"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 19:25 IST

Budget 2021, Latest News and updates, Nirmala Sitharaman : आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

ठळक मुद्देकृषीमंत्री चर्चा करण्यास तयार आहेत, असे निर्मला सीतारामन यांनी सांगितले.

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. दरम्यान, या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.   (Budget 2021 Latest News and updates)

आंदोलनावर तोडगा काढण्याचा एकमेव मार्ग म्हणजे चर्चा आहे. केंद्र सरकारने चर्चेचा मार्ग खुला केला आहे. कृषीमंत्री चर्चा करण्यास तयार आहेत, असे निर्मला सीतारामन यांनी सांगितले. निर्मला सीतारामन म्हणाला, " दिल्ली सीमेवर शेतकरी आहेत, आम्ही सर्व जण समजून घेत आहोत. कृषीमंत्री बोलण्यास तयार आहेत. चर्चा हा एकच मार्ग आहे. केंद्र सरकारने चर्चेचा मार्ग खुला केला आहे. ज्या शेतकऱ्यांच्या मनात शंका आहेत, ते चर्चा करु शकतात."

दरम्यान, याआधी अर्थसंकल्पीय भाषणात निर्मला सीतारामन म्हणाल्या की, आमचे सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी वचनबद्ध आहे. शेतमालाला दीडपट हमीभाव देण्यासाठी प्रयत्नशील आहे. गहू उत्पादकांना ७५ हजार ६० कोटींच्या मदतीकरता तरतूद करण्यात आली. गव्हाचे उत्पादन घेणाऱ्या ४३ लाख शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. 

याशिवाय, सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दिशेने काम करत आहे. मागील यूपीए सरकारपेक्षा मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये तीनपट निधी पोहोचला आहे. तसेच, सरकारकडून प्रत्येक सेक्टरमधून शेतकऱ्यांना मदत केली जात आहे. डाळी, गहू, धान आणि इतर पिकांचा एमएसपी वाढविला आहे, असे निर्मला सीतारामन यांनी सांगितले.

सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दिशेने काम करत आहे. मागील यूपीए सरकारपेक्षा मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये तीनपट निधी पोहोचला आहे. तसेच, सरकारकडून प्रत्येक सेक्टरमधून शेतकऱ्यांना मदत केली जात आहे. डाळी, गहू, धान आणि इतर पिकांचा एमएसपी वाढविला आहे, असेही निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले.

विरोधकांकडून कृषी कायद्यांविरोधात घोषणाबाजीअर्थसंकल्पीय भाषणात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत शेतकऱ्यांचा उल्लेख करताच विरोधकांनी गदारोळ घातला. तसेच, सभागृहात सुरू करताच विरोधी पक्षातील खासदारांनी नवीन तीनही कृषी कायदे मागे घेण्याची मागणी सुरू केली. दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपासून पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील हजारो शेतकरी दिल्लीच्या विविध सीमेवरील या तिन्ही कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत. 

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनFarmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरीbudget 2021बजेट 2021