शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: राज्यात मतदानाला सुरुवात, मतदारांची केंद्रांवर गर्दी
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
5
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
6
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
7
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
8
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
9
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
10
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
11
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
12
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
13
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
14
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
15
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
16
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
17
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
18
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
19
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
20
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट

Budget 2021: बंगाल निवडणुकीवर लक्ष?; जेव्हा सितारमण यांनी केला टागोरांच्या ओळीचा उल्लेख, विश्वास एक असा पक्षी आहे...

By श्रीकृष्ण अंकुश | Published: February 01, 2021 1:04 PM

सीतामरण म्हणाल्या 'इतिहासातील हा क्षण एका नव्या युगाची पाहाट आहे, यात भारत एक आशेची भूमी बनण्याकडे वाटचाल करत आहे.'

ठळक मुद्देसरकारने बंगालमध्ये महामार्गांसाठी 25 हजार कोटी रुपयांची घोषणा केली आहे. या राष्ट्रीय महामार्गांची लांबी 675 किलोमीटर एवढी असणार आहे.कोलकाता-सिलीगुडी महामार्गाचेही अपग्रेडेशन करण्याची घोषणा

नवी दिल्‍ली - कोरोना महामारीच्या काळातच अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचे पहिले पेपरलेस बजेट सादर केले. यावेळी त्यांनी नोबेल पुरस्‍कार विजेते कवी रवींद्रनाथ टागोर यांच्या एका ओळीचाही उल्लेख केला. कोरोनाविरोधातील भारताच्या लढाईचा उल्लेख करत सीतारमण म्हणाल्या, "मी रवींद्रनाथ टागोर यांच्या एका ओळीचा उल्लेख कत आहे, ते म्हणाले होते,  'Faith is the bird that feels the light and sings when the dawn is still dark." अर्थात "विश्वास एक असा पक्षी आहे, जो पहाटेच्या अंधकारातही प्रकाश अनुभवतो आणि गातो." रविंद्रनाथ टागोर हे मुळचे बंगालचे होते आणि आगामी काळात बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत.

निवडणुकीपूर्वीच पश्चिम बंगालला गिफ्ट, महामार्गांसाठी 25 हजार कोटींची घोषणा -सरकारने बंगालमध्ये महामार्गांसाठी 25 हजार कोटी रुपयांची घोषणा केली आहे. या राष्ट्रीय महामार्गांची लांबी 675 किलोमीटर एवढी असणार आहे. याशिवाय बजेटमध्ये सीतारमण यांनी कोलकाता-सिलीगुडी महामार्गाचेही अपग्रेडेशन करण्याची घोषणा केली आहे. सध्या बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही राजकीय वातावरण तापलेले आहे.

Budget 2021 Live : वाहनांचे सुटे भाग महागणार; 'स्वदेशी' मोबाईल स्वस्त होणार

इतिहासातील हा क्षण एका नव्या युगाची पाहाट -यावेळी बोलताना सीतामरण म्हणाल्या 'इतिहासातील हा क्षण एका नव्या युगाची पाहाट आहे, यात भारत एक आशेची भूमी बनण्याकडे वाटचाल करत आहे.' त्या म्हणाल्या, कोरोना संकट काळात केंद्र सरकारने गरिबांना शक्य ती सर्व मदत केली. कोरोना काळात सरकारने छोट्या आणि मध्यम उद्योगांनाही मदत केली. 'आत्मनिर्भर भारत'अंतर्गत एकूण 27.1 लाख कोटी रुपयांचे पॅकेज जारी करण्यात आले. या महामारीमुळे जागतीक अर्थव्यवस्थेत अभूतपूर्व मंदी आली. असे असतानाही भारताने फार चांगल्याप्रकारे काम केले आहे.

Budget 2021, Automobile sector : जुन्या कारचं आयुष्य ठरलं, अर्थसंकल्पात 'व्हेईकल स्क्रॅप पॉलिसी'चा समावेश 

35 हजार कोटी रुपये कोरोना लसीकरणासाठी -कोरोनाने आपल्या देशाच्या आरोग्य क्षेत्राची जाणीव करून दिली. यामुळेच, यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्राला भरभरून देण्यात आले आहे. आरोग्य खात्याच्या अर्थसंकल्पात तब्बल 137 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात 35 हजार कोटी रुपये कोरोना लसीकरणासाठी देण्यात आले असून गरज भासल्यास आणखी निधी देण्यात येईल, असे निर्मला सितारमण यांनी सांगितले. यंदा आरोग्य खात्यासाठी तब्बल 2 लाख 32 हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर होत आहे. गेल्या वर्षीचा आरोग्य खात्याचा अर्थसंकल्प हा 92 हजार कोटी रुपयांचा होता. म्हणजेच, यंदाच्या बजेटमध्ये तब्बल 137 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 

Budget 2021, Infrastructure: मुंबई-कन्याकुमारी कॉरिडोर; निर्मला सीतारामन यांची ११०० किमीच्या हायवेची घोषणा

टॅग्स :budget 2021बजेट 2021Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनwest bengalपश्चिम बंगालRavindranath Tagoreरवींद्रनाथ टागोर